महाराष्ट्राची लाडकी सून होणार सासूबाई

महाराष्ट्राची लाडकी सून होणार सासूबाई

अलका कुबल होणार सासूबाई, मुलीचा पार पडला रोका

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. ‘माहेरची साडी’ या चित्रपटातून त्या घराघरात पोहचल्या आणि या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने महाराष्ट्रातील रसिकांची मनं जिंकली. अजूनही अलका कुबल यांनी साकारलेली भूमिका आजही रसिकांच्या चांगलीच लक्षात आहे. ‘लेक चालली सासरला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आदर्श सूनेची भूमिका साकारली. मात्र आता लवकरच त्या खऱ्या आयुष्यात सासूबाई बनणार आहेत. अलका कुबल यांनी ही गोड बातमी चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अलका कुबल यांची मुलगी इशानीची रोका सेरेमनी पार पडली आहे. या सेरेमनीचे फोटो अलका कुबल यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले असून चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

इशानी आणि कस्तुरी अशा अलका कुबल यांना दोन मुली आहे. इशानी ही त्यांची मोठी मुलगी असून ती दिल्लीतील निशांत वालियांशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांची रोका सेरेमनी पार पडली आहे मात्र अजून लग्नाची तारिख समोर आलेली नाही आहे.

इशानीला लहानपणापासून वैमानिक होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे तिने आपल्या ध्येयावर ठाम राहून जिद्द आणि मेहनतीमुळे तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं. २०१५ मध्ये इशानीला वैमानिकाचं ‘लाइफ टाइम लायसन्स’ मिळालं. सध्या ती मियामी, फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. तसंच तिचा होणार पती निशांत देखील मियायीमध्येच राहतो.

नुकतचं अलका कुबल यांना आपण धुरळा या चित्रपटात पाहिलं. अभिनेता अकुंश चौधरीची सावत्रआई ज्योती उभे ऊर्फ अक्काची भूमिका अलका कुबल यांनी साकारली आहे.


हेही वाचा – मनीष मल्होत्राने डिझाईन केला मुंबईच्या अश्वपथकाचा युनीफॉर्म!


 

First Published on: January 22, 2020 3:12 PM
Exit mobile version