घरमनोरंजनमनीष मल्होत्राने डिझाईन केला मुंबईच्या अश्वपथकाचा युनीफॉर्म!

मनीष मल्होत्राने डिझाईन केला मुंबईच्या अश्वपथकाचा युनीफॉर्म!

Subscribe

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने मुंबईत होणाऱ्या माऊंटेड हॉर्स यूनीट चा युनीफॉर्म डिझाईन केला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मुंबई पोलिसांचा वर्षिक कार्यक्रम उमंग २०२० मुंबईत पार पडणार आहे. यासाठी पोलिसांसाठी खास वर्दी तयार करण्यात आली आहे. ही वर्दी मुंबईचे नामांकित ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केली आहे.

- Advertisement -

या खास वर्दी विषयी बोलताना मनिश म्हणाला, ही वर्दी म्हणजे एक शेरवानी आहे. ज्या शेरवानीवर छाती आणि दंडावर धाग्याचे काम आहे. जे हाताने केले आहे. त्याचप्रमाणे खांद्यावर असणाऱ्या एपोलेटमुळे शाही लूक आला आहे. त्याचप्रामणे या वर्दीला मराठी योध्दाची जी खास पगडी असते त्यानुसार बनवण्यात आली आहे. ज्याच्या चारही बाजूला सोनेरी दोरे लावले आहेत. त्याचप्रमाणे पेहरवाच्या खालच्या बाजूला भारतीय खास ब्रीचेस लावण्यात आले आहेत. त्याचप्रामणे कमरेला असणारा लाल पट्टा शाही पोलिसाचा लूक आणत आहे. या ५३ व्या उमंगसाठी मनिष मल्होत्राला पोलिस आयुक्ताद्वारे खास आमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबईमध्ये माऊंटेड हॉर्स युनीट १९३२ साली बंद करण्यात आले होते. पण आता शहरातील वाढती गर्दी बघता या युनीटची गरज भास लागली आहे. कारण हे युनीट गर्दीच्या ठिकाणी सहरीत्या पोहचू शकते. ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत पोलिस युनीटची स्थापना केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -