‘गैरी’ चित्रपट १६ डिसेंबरला होणार प्रदर्शित

‘गैरी’ चित्रपट १६ डिसेंबरला होणार प्रदर्शित

उत्तम स्टारकास्ट असलेल्या आणि आदिवासींच्या समस्या मांडणाऱ्या आगामी “गैरी” या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. आदिवासी समाजातील डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट “गैरी” या चित्रपटातून १६ डिसेंबरला रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या “गैरी” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केलं आहे. गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीतलेखन, अमितराज, मयुरेश केळकर यांचे संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वैशाली सावंत, अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्वसंगीत मयुरेश केळकर यांचं आहे. विनोद पाटील यांचं छायालेखन आहे. अभिनेता मयुरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

आदिवासी समाजातील एका डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या “गैरी” हा चित्रपट मांडतो. चित्रपटाच्या टीजरमधूनच चित्रपटाच्या रंजक कथेचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे “गैरी” चित्रपटाविषयी आता कुतुहल निर्माण झाले आहे.

 


हेही वाचा :

मनाचा तळ शोधणारा ‘गोदावरी’

First Published on: November 10, 2022 12:29 PM
Exit mobile version