शिवानीचं कमबॅक

शिवानीचं कमबॅक

शिवानीच कमबॅक

‘असत्याल लय मनमौजी पण लाखात एक माझा फौजी’ असं म्हणत प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचून मनामनावर राज्य करणारी शितली पुन्हा छोट्या पडद्यावर कधी दिसणार अशा चर्चा रंगत असताना सोनी मराठीवरील ‘कुसुम’ या मालिकेतून तिने दमदार एंट्री घेतली आहे. तिच्या या मालिकेविषयी तिने माय महानगरशी मारलेल्या खास गप्पा.

प्रत्येक भूमिका वेगवेगळी परिस्थिती आणि पार्श्वभूमीतून आलेली असते. आधी जी भूमिका होती ती गावात राहणारी डॅशिंग अशी मुलगी होती आणि कुसुम जर आपण आता पाहिल तर ती मुंबईत वाढलेली मुलगी आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आहे तिला स्वतः ची मत आहेत. कुसुम आजच्या जमान्याची मुलगी आहे.

शिवानी खरतर शिवानीसारखी आहे. परंतु प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला काहीना काही शिकवत असत. कलाकार म्हणून   भूमिका निभावत असतात. पण कुसुम पण असाव हे प्रत्येक मुलीच स्वप्न असत कारण आपल्या आईबाबांची जबाबदारी घ्यावी अस प्रत्येक मुलीला वाटत कारण आईबाबांसाठी कितीही केल तरी ते कमीच आहे.

सोशल मिडीया अपडेट ठेवायचा प्रयन्त मी खरच करत असते. पण कधी कधी शूटमुळे जमल नाही तरी करावं लागतं कारण एक कलाकार म्हणून मी आणि माझे फॅनस एकमेकांशी संवाद साधू शकतो.

आता सध्या माझ शूटिंग लोकेशन घरापासून जवळ असल्यामुळे मला घरी जाता येत. रोज आईबाबांना भेटता येत .दिवाळी जवळ येतेय त्यामुळे घरची साफसफाई फराळ बनवणं या गोष्टी मी खूप मिस करणार आहे. पण सेटवर वातावरण खूप छान आहे त्यामुळे आम्ही इथेसुद्धा खूप एँजाय करतो.

अजूनही कोरोना गेलेला नाही त्या मुळे काळजी घ्या सुरक्षित राहून दिवाळी साजरी करा आणि असच आमच्या मालिकेवर प्रेम करत राहा.


हेही वाचा – ‘ती’ परत आलीये…

 

First Published on: October 22, 2021 9:09 PM
Exit mobile version