घरताज्या घडामोडी'ती' परत आलीये...

‘ती’ परत आलीये…

Subscribe

झी मराठी वरील ती परत आलीये मालिकेमधील सायली ही भूमिका साकारून प्रेक्षकांना थरार विश्वात घेऊन जाणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट

सिध्दी सुभाष कदम: झी मराठी वरील ती परत आलीये मालिकेमधील सायली ही भूमिका साकारून प्रेक्षकांना थरार विश्वात घेऊन जाणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट हिने माय महानगरशी मारलेल्या खास गप्पा.

मटा श्रावण क्वीन २०१६ची ती विजेती ठरली आणि अभिनय क्षेत्राच्या वाटेवरचा तिचा प्रवास सुरु झाला. ‘एक निर्णय’ या चित्रपटातून तिला पहिला ब्रेक मिळाला. तर ‘स्वामिनी’ मधील तिने साकारलेली आनंदीबाई प्रेक्षकांना पेशवेकाळात घेऊन गेली. ‘चंद्र आहे साक्षीला’ या सिरीअल मधून घराघरात पोहोचली आहे. आता ती परत आलीये या मालिकेत सायली साकारून तिने निगेटीव्ह कॅरॅक्टर ला ब्रेक दिला जाणून घेऊया कुंजिका काळविंतच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी.

- Advertisement -
  • ऐतिहासिक भूमिका, ग्रे शेडची भूमिका आणि आता थरीलर पार्श्वभूमी असणारी सिरीअल या प्रवासा विषयी काय सांगशील?

तिनही भूमिका खूप वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे तिनही मध्ये वेगळा अनुभव मिळाला. कारण पहिली भूमिका होती स्वामिनी मालिकेतील ती ऐतिहासिक असून मालिका विश्वातील ते माझ पदार्पण होत. चंद्र आहे साक्षीला मधील प्रिया ही वेगळ्या देशातून आल्यामुळे ते mordern कॅरॅक्टर होत.आणि आता ती परत आलीये मधील सायली हे तर फार वेगळ कॅरॅक्टर आहे . सगळ्यांना सांभाळून घेणारी लाजिकली वागणारी ती आहे साधारण परिस्थितीचा कंटरोल घेणार अस पात्र आहे.

  • कलाकारावर एकाच धाटणी च्या भूमिकेचा ठसा पडतो अस वाटत का ?

आताचा प्रेक्षकवर्ग इतका सुजाण आहे की त्यांना व्यवस्थित कळत की हे कॅरॅक्टर आहे आणि वस्तुस्थिती वेगळी आहे.तरी मला अशी भीती होती आणि तस व्हायचही मला निगेटीव्ह कॅरॅक्टर केल्यावर तशाच कामासाठी विचारल जायच पण देवाच्या कृपेने आताच जे काम करत आहे ते अत्यंत पॉझिटीव्ह आहे.

- Advertisement -

 

  • तुझ्या अभिनया बरोबर तुझ फोटोशूटही तितकच चर्चेत असत त्याविषयी काय सांगशील?

अभिनय क्षेत्रात आल्यावर फोटोशूट ही गोष्ट येतेच ते करण भाग असत अस म्हणण्यापेक्षा ते करण्यात खूप मजा येते. पण फोटोशूट करण म्हणजे नुसत जाऊन उभ राहण नसून त्यावर वेगळा अभ्यास करावा लागतो.फोटोशूट करताना एक वेगळा माईडसेट करावा लागतो कारण प्रत्येक फोटो मध्ये डोळयातून तो भाव दिसावा लागतो .त्यावर काम करण्यासाठी मी इतर कलाकारांचे शिवाय माझे जुने फोटो पाहते आणि काय बदल करता येईल. ते बघत बघत मी सुधारणा करते.तसच बरेच बरेणड आमच्याशी कोलॅब करतात. आमच्या माध्यमातून एखाद प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवतातमग त्या अनुषंगाने ते प्रोडक्ट सुद्धा कस प्रेझेंट करता येईल याचा विचार करावा लागतो .काही स्वतःसाठी सुद्धा फोटोशूट मी करते .मधल्या काळात सतत ट्रेडिशनल लूकमधील शूट मुळे तोचतोचपणा येत गेला त्यामुळे मी लेटेसट फोटोशूट केल त्यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

  • Instagram Influencers ना भूमिका देण्यात प्राधान्य दिल जात अशा चर्चेला मध्यंतरी उधाण आल तर त्यावर तुमच काय मत आहे?या क्षेत्रात आल्यावर इनसटा वर अकटीवह असण यात एक वेगळी मजा असते. पण यामध्ये माझे फालोअस किती आहेत किंवा व्हूज किती वाढतात याकडे लक्ष न देता मजा घेऊन पोस्ट केल किंवा लोकांना त्यातून आनंद मिळाला की ते विसरून जाव.मला नाही वाटत कामावर त्याचा परिणाम होतो कारण तुमच काम चांगल असेल तर तुम्ही कासट व्हालच. तुमच काम लोकांपर्यंत कसही पोहोचेल. मला तरी फोलोअरस पाहून कास्टिंग होतय असा अनुभव आला नाहीये.

 

  • त्या मागे कलाकारांची विशेष मेहनत असते, अभ्यास असतो. तर तो अभ्यास तू कसा करतेस?

स्वामिनी ऐतिहासिक असल्या मुळे ती भाषा खूप वेगळी होती त्यामुळे त्यावर खूप काम कराव लागायच कारण तो काळ प्रेझेंट करण अपेक्षित होत. आनंदीबाई चा निगेटीव्ह पणा अंगी बाणायला थोडा त्रास झाला कारण पर्सनली आपण इते डावपेच रचण किंवा निगेटीव्ह नसतो यात दिग्दर्शकाच खूप सहाय्य झाल. त्यानंतर चंद्र आहे साक्षीला मधील प्रिया करताना आनंदीबाईंचा हेल तिथे येत होता तो मला जाणीपूवक टालावा लागला कारण ते कॅरॅक्टर माडन होत. ती परत आलीये मधील सायली बद्दलमला जेव्हा कळल तेव्हा मनात एक भीती होती कारण थरीलर पार्श्वभूमी असणारी सिरीअल होती.त्यात तिला रात अंधलेपणा होता यासाठी आजूबाजूला असे दिव्यांग असणारया लोकांच मी निरीक्षण केल शिवाय तशा पद्धती च्या हारर फिल्म मी पाहिल्या आणि अभ्यास केला.

 

  • मालिकेच्या शूटिंग निमित्त सतत कलाकार घरापासून दूर असतात तर सणावाराला घराला किती मिस करतेस?

बरेच सण मालिकांच्या शूटिंग मुळे मिस झाले . कुटुंब आणि गिरगावातीलमित्र मंडळी यांना खूप मिस करते.पण घरापासून लांब राहण हा एक वेगळा अनुभव आहे . पण आमची टीम खूप छान आहे सेटवर आम्ही खूप एनजाय करतो. एकमेकांशी विविध अनुभव शेअर करतो. मला अस वाटत की इथे सेटवर माझी दुसरी फॅमिलीच आहे.

 

  • भविष्यात आता कशा प्रकारची भूमिका करायला आवडेल?तुझ्या आगामी प्रोजेक्ट विषयी काही सांगू शकशील का?

माझा असा डरीम रोल असा एक नाहीये ..कारण मला आता तिनही शो मध्ये वेगवेगळे कॅरॅक्टर मिळाले आणि असच मला वेगवेगळ करण्यात मजा येईल.मला वेबसिरीजचा जमाना आहे .तर त्यात एखाद वेगळ कॅरॅक्टर करायला आवडेल. ओटीटी पलॅटफाम वरती नवीन टीमसोबत नवीन स्टोरीसाठी काम करायला आवडेल

  • अभिनय क्षेत्रात सटगल करणारया किंवा या क्षेत्रात करियर करू इच्छितोमणारया ना तू काय मार्ग दर्शन करशील?

खरतर मार्गदर्शन करण्या इतकी मी मोठी नाही पण एक सांगेन की मनात इच्छा असली तर ते कसही घडून येत कारण मी सहा वर्ष बॅंकेत नीकरी केली आणि सहा वर्षानी या क्षेत्रात आले .नोकरीमध्ये एक रोजच काम सेट असत कामाची शोधाशोध नसते. मला या क्षेत्रात काम करून दीड वर्ष झाली. लोकांनी मला छान स्विकारलं आहे अस सगळया च्या बाबतीत होत अस नाही. त्यामुळे काम मिळत नाही म्हणून त्रास करून न घेता त्या काळात स्वतःवर मेहनत करणे आवश्यक आहे.मी बॅंकेत का करत असताना सतत अभिनेत्री व्हायच सवपन मनात घेऊन होते हे माझ्यासाठी स्वतला परिपेर करण मोठ सटगल होत.


हेही वाचा – 26 Years of DDLJ: ‘त्या’ गाण्यात टॉवेल गुंडाळून डान्स करण्यासाठी काजोलने दिला होता नकार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -