कहाणी थेंबाची महती पाण्याची

कहाणी थेंबाची महती पाण्याची

पाण्यासाठी कितीही पर्याय शोधले तरी वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाई पुढे सुरुच राहणार आहे. इतकेच काय तर जागतिक पातळीवरील प्रश्न होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आपल्या पद्धतीने जनजागृती करत असले तरी मनोरंजन माध्यमानेही ही समस्या हाताळलेली आहे. गेल्या दोन-चार वर्षात जे चित्रपट आले त्यात आता एचटूओ या चित्रपटाची भर पडणार आहे. वैज्ञानिक भाषेत पाण्यासाठी वापरले जाणारे नाव आहे. कहाणी थेंबाची ही त्याची टॅग लाईन आहे.

एचटूओ हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित करण्याचा निर्माता, दिग्दर्शकाचा मानस आहे. संदीप पाटील दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती सुनिल झवर यांनी केलेली आहे. चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडियावर लॉन्च केलेले आहे. कोरड्या जमिनीवर पाण्याचे थेंब पडलेले आहेत. एका पायात बूट तर दुसर्‍या पायात चप्पल असे पोस्टर त्याचे आहे. महत्त्वाचं म्हणजे नवकलाकारांना प्राधान्य देऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

First Published on: March 12, 2019 4:18 AM
Exit mobile version