‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर होईल मयूरी वावदानेची स्वप्नपूर्ती!

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर होईल मयूरी वावदानेची स्वप्नपूर्ती!

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर होईल मयूरी वावदानेची स्वप्नपूर्ती!

माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. ज्ञान तुम्हांला कधीही उपयोगी पडू शकतं आणि हीच तुमची खरी ताकद आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. या आठवड्यात मुंबईची मयूरी वावदाने हॉट सीटवर खेळायला आली आहे. मयूरी एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. मयूरीच्या आईचं स्वप्न होत हॉट सीटवर खेळायला यायचं, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. हॉट सीटवर बसण्याची आणि कुटुंबावरचं कर्ज फेडण्याची संधी आता मयूरीला मिळाली आहे. सचिन खेडेकर हे उत्तम संचालक असून हॉट सीटवर असलेल्या सर्व स्पर्धकांना सांभाळून घेतात आणि त्यांना बोलतंही करतात. मयूरीला तिच्या स्वप्नाविषयी विचारलं असता कुटुंबावर असलेलं कर्ज फेडता यावं, असं ती म्हणाली.

 

आपल्या ज्ञानाच्या जोरावर इथपर्यंत पोचलेली मयूरी तिच्या कुटुंबाला या खेळामुळे कर्जमुक्त करेल. गेल्या अनेक दशकांपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरात आवडीने पाहिला जात आहे. तसेच या मालिकेव्दारे अनेकाचं करोडपती होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. बुद्‌धीमत्ता,कौशल्य,कलागुण,वेळेचं योग्य नियोजन,विचारपुर्वक निर्णय घेण्याची क्षमता माणसाच्या आंतरिक कौशल्यावर हा कार्यक्रम आधारित आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य फक्त पैशेच जिंकणे नाही तर लोकांच्या जनरल नॉलेजमध्ये वाढ करणे हे सुद्धा मुख्य कारण आहे. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती. अशीच आशा घेऊन मयूरीने स्पर्धेत भाग घेतला आहे.


हे हि वाचा – शेजाऱ्यांनाही ठाऊक नाही मास्टर भिडेच खरं नाव, वीज बिलही येतं ‘भिडे’ नावानेच

First Published on: July 27, 2021 2:46 PM
Exit mobile version