#MeToo वर बोलले ‘बिग बी’

#MeToo वर बोलले ‘बिग बी’

अमिताभ बच्चन (प्रातिनिधिक फोटो)

मागील अनेक दिवसांपासून बॉलीवूडमध्ये #MeToo मोहिमेचे लोण पसरते आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रीटीजने यामध्ये उडी घेतली आहे. इंडस्ट्रीतील अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी  काही अभिनेते आणि दिग्दर्शकांवर आरोप केला आहे, तर काहींनी या #MeToo मोहिमेला बाहेरून पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर आता बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अखेर #MeToo मोहिमेबाबत आपलं मौन सोडलं आहे. वाढदिवसाच्या मुहूर्तावर बिग बी अमिताभ यांनी #MeToo मोहिबाबत वक्तव्य केले आहे. खास वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका मुलाखतीदरम्यान बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले :

कोणत्याही महिलेसोबत गैरवर्तन होणे चुकीचे आहे, खास करुन कामाच्या ठिकाणी. महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविषयी त्वरित आवाज उठवला पाहिजे. याविषयी समोर येऊन निर्धास्तपणे बोलले पाहिजे. शैक्षणिक पातळीवरच शिस्त, सामाजिक भाव-भानवा आणि मूल्यक्षिणाचे धडे देणं गरजेचं आहे. समाजातील ज्या महिला लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत, त्यांच्यासाठी खास सुरक्षा केंद्र असले पाहिजे. ही चांगली बाब आहे की आजकाल बऱ्याचशा संस्थांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा विशेष विचार केला जातो. हीच गोष्ट आपल्या देशाला पुढे घेऊन जाणार आहे. मात्र, महिलांना आपण आवश्यक ती सुरक्षा आणि मानसन्मान देऊ शकत नसल्यास ही शरमेची बाब आहे.

 

वाचा:  #MeToo वादळ मोदी सरकारमधील मंत्र्याचा बळी घेणार?
वाचा:  #Metoo मध्ये आमिर खानची उडी, केली मोठी घोषणा

 

First Published on: October 11, 2018 2:20 PM
Exit mobile version