Miss World 2021 : ‘मिस वर्ल्ड २०२१’ ग्रँड फिनाले रद्द, मानसा वाराणसीसह १७ जण पॉझिटिव्ह

Miss World 2021 : ‘मिस वर्ल्ड २०२१’ ग्रँड फिनाले रद्द, मानसा वाराणसीसह १७ जण पॉझिटिव्ह

Miss World 2021 : 'मिस वर्ल्ड २०२१' ग्रँड फिनाले रद्द, मानसा वाराणसीसह १७ जण पॉझीटीव्ह

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूची दहशत पाहायला मिळतेय. भारतासह ३६ हून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. अशातच ‘मिस वर्ल्ड २०२१’ च्या ग्रँड फिनाले इव्हेंटमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. स्पर्धक मानसा वाराणसीला कोरोनाची लागण झाली आहे. मानसाशिवाय आणखी १७ स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या या सर्वांना पोर्तो रिकोमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने स्पर्धक, कर्मचारी, क्रू आणि सामान्य लोकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टाने हा इव्हेंट तात्पुरता पुढे ढकलला आहे. भारताची मानसा वाराणसी ‘मिस वर्ल्ड २०२१’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार होती.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने निवेदन सादर करत म्हटले की, ‘मिस वर्ल्ड २०२१’ च्या ग्रँड फिनाले इव्हेंट पुढील ९० दिवसांच्या आत पोर्तो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रेलॉट येथे आयोजित केला जाईल.

भारताच्या हरनाज संधूने यंदा ‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा किताब जिंकल्यानंतर आत्ता सर्वांचे लक्ष ‘मिस वर्ल्ड २०२१’ कडे लागले होते. या स्पर्धेत मानसा वाराणसी ही भारताचे प्रतिनिधीत्व करणार होती. मात्र स्पर्धा पूर्ण होण्याआधीच तिला कोरोना विषाणूने गाठले. मानसाने यापूर्वी ‘मिस इंडिया २०२०’ चा मुकुट आपल्या डोक्यावर सजवला होता. सध्या मानसासह १७ पॉझिटिव्ह रुग्णांवर पोर्तो रिकोमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय.

‘मिस वर्ल्ड २०२१’ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा अर्थात ग्रँड फिनाले पोर्तो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रेलॉट याच ठिकाणी पुन्हा आयोजित केला जाणार आहे. असे आयोजकांनी सांगितले. परंतु स्पर्धक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांना घरी परतवण्याची परवानगी दिली जाईल.

मानसा वाराणसी कोण आहे?

‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२१’ विजेती मानसा वाराणसीचा जन्म हैदराबादमध्ये झालाय. २३ वर्षीय मानसाचे शालेय शिक्षण वासवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून झाले आहे. भारतातील प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेचा मुकुट तिने जिंकला आहे. या स्पर्धेपूर्वी तिने फायनानशियल एक्सचेंज इनफॉर्मेशन एनालिस्ट म्हणून काम केले. अगदी अलीकडे, तिने ‘मिस वर्ल्ड २०२१’ स्पर्धा सुरू असताना ब्युटी विथ पर्पज (BWAP) स्पर्धा जिंकली. मानलसाला यावर्षी मिस वर्ल्डचा ताज जिंकण्याची देखील एक नवी संधी होती.


उत्तर कोरियात आनंदी होण्यासह हसण्या, रडण्यावर बंदी, किम जोंगचे आदेश


First Published on: December 17, 2021 1:51 PM
Exit mobile version