घरताज्या घडामोडीउत्तर कोरियात आनंदी होण्यासह हसण्या, रडण्यावर बंदी, किम जोंगचे आदेश

उत्तर कोरियात आनंदी होण्यासह हसण्या, रडण्यावर बंदी, किम जोंगचे आदेश

Subscribe

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोगंचे निर्णय आणि उत्तर कोरियातील जाचक अटी नेहमीच चर्चेत असतात. आता पुढील ११ दिवस उत्तर कोरियामधील नागरिकांच्या हसण्यावर आणि आनंदी राहण्यावर बंदी असणार आहे. तसेच नागरिक मद्यपानही करु शकत नाहीत असे आदेश लागू करण्यात आले आहेत. हुकुमशाह किम जोंगच्या वडिलांची १० वी पुण्यतिथी असल्यामुळे देशात ११ दिवस शोक पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनचे वडील किम जोंग-इल यांची १० वी पुण्यतिथी आहे. किम जोंग-इल यांनी उत्तर कोरियावर १९९४ ते २०११ पर्यंत राज्य केलं आहे. देशात किम जोंगच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त ११ दिवस कोणताही कार्यक्रम करण्यात येणार नाही. लोकांना हसण्यावर, आनंदी होण्यावर तसेच मद्यपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी आनंदी किंवा हसताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. किम जोंगच्या वडिलांच्या मृत्यूला १० वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी किम जोंग रडतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

जनतेवर असणार पोलिसांची नजर

देशात पुढील ११ दिवस कोणताही कार्यक्रम आणि वाढदिवस साजरा करता येणार नाही. पोलिसांना लोकांवर नजर ठेवण्यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागिरक नाराज आहेत की नाही? याबाबत माहिती घेण्याची जबाबदरी पोलिसांवर देण्यात आली आहे. किम जोंगच्या वडिलांचा मृत्यू १७ डिसेंबर २०११ साली झाले. तेव्हा किम जोंग-इल ६९ वर्षांचे होते. उत्तर कोरियावर किम जोंगच्या वडिलांनी १७ वर्ष राज्य केले होते. त्यांच्या स्मरणार्थ देशात १० दिवसांचा दुखवटा पाळण्यात येतो. परंतु यंदा १० वर्ष पूर्ण झाल्यामुळे ११ दिवस हसण्या आणि आनंदी राहण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


हेही वाचा :  बलात्काराला विरोध करता येत नसेल तर आनंद घ्या; काँग्रेस आमदाराचे आक्षेपार्ह वक्तव्य

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -