Shabaash Mithu Teaser :अनुष्कानंतर तापसीही क्रिकेटरच्या भूमिकेत, शाब्बास मिठ्ठूचा टीझर आऊट

Shabaash Mithu Teaser :अनुष्कानंतर तापसीही क्रिकेटरच्या भूमिकेत, शाब्बास मिठ्ठूचा टीझर आऊट

Shabaash Mithu Teaser :अनुष्कानंतर तापसीही क्रिकेटरच्या भूमिकेत, शाब्बास मिठ्ठूचा टीझर आऊट

अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर अभिनेत्री तापसी पन्नू देखील भारतीय महिला क्रिकेटरच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. अनुष्का शर्मा भारताची माजी महिला कॅप्टन झूलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारीत चकदा एक्सप्रेस या सिनेमात दिसणार आहे. अनुष्का पाठोपाठ आता तापसी पन्नूचा बहुप्रतिक्षीत शाब्बास मिठ्ठू सिनेमाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. शाब्बास मिठ्ठू हा सिनेमा भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन  मिताली राजच्या आयुष्यावर आधारित असून तापसी पन्नू यात मितालीच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरची सुरुवातच क्रिकेट स्टेडिअममधील प्रेक्षकांची गर्दी आणि कॉमेंट्रीने होते. कॉमेंटेटर क्रिकेटरचे कौतुक करताना दिसतो. त्यानंतर ३ नंबर जर्सी घातलेली, बॅटिंग करण्यासाठी सज्ज असलेल्या मिताली राजच्या भूमिकेतील तापसीची एंट्री होते.

तापसीचा सिनेमात एक वेगळात लूक समोर आला आहेच. तापसीने सिनेमात हुबेहूब मिताली साकारली आहे. जेंटलमेंनने भरलेल्या खेळात त्यांनी केवळ इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर त्यांनी स्वत:ची कथा लिहिली, असे कॅप्शन देत तापसीने सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. शाब्बास मिठ्ठू हा सिनेमा २०२२मध्ये रिलीज होणार होता. परंतु सिनेमाची रिलीज डेट काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमाच्या नवीन रिलीज डेटची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

श्रीजीत मुखर्जींनी शाब्बास मिठ्ठू सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर सिनेमात तापसीसह अभिनेते विजय राज देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाची कथा क्रिकेटर मिताली राज हिच्या क्रिकेट प्रवासावर आणि तिच्या स्ट्रगलवर आधारित आहे. मिताली २०१७मध्ये महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला पुढे घेऊ गेली होती.

तापसी पन्नी अनेक दिवसांपासून या सिनेमाची तयारी करत होती. सिनेमासाठी तिने प्रोफेशनल क्रिकेट ट्रेनिंग देखील घेतली. शाब्बास मिठ्ठू व्यतिरिक्त तापसी येत्या काळात जन गण मन, दोबारा, एलियन, मिशन इम्पॉसिबल, ब्लर सारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

First Published on: March 21, 2022 8:05 PM
Exit mobile version