घरमनोरंजन'शेर शिवराज' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

‘शेर शिवराज’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

या टिजरमध्ये प्रतापगडावर फडकणारा भगवा झेंडा, शिवरायांचा रक्तानं माखलेला हात, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखं यासारखा चित्तथरारक अनुभव टीझरमधून आपल्याला पहायला मिळतोय.

आजवर शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक भव्य-दिव्य चित्रपट तयार झाले आहेत. अनेक शिवचरित्र जाणकारांनी आणि इतिहासकारांनी आपापल्या शैलीत शिवचरित्राचे सुंदर वर्णन केले आहे. कधी वेगवेगळ्या चित्रपटांतून, मालिकांमधून तर कधी पुस्तकांमधून आपण शिवरायांचे शिवचरित्र वाचले आहे. येत्या 22 एप्रिल रोजी असाच एक शिवकालीन कथेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘शेर शिवराज’ असून, या चित्रपटामध्ये शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा अध्याय दाखवलेला आहे. नुकतंच या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफजलखान वधाचा थरारक अनुभव ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडला आहे. या चित्रपटात दिग्पाल लांजेकर यांच्यासह निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांनीसुद्धा विशेष सहाय्य केले आहे.

- Advertisement -

‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटात शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कसा केला हे दाखवलेला आहे. शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं, बुद्धिचातुर्याची, गनिमी काव्याची आणि चतुराई या गुणांचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात घडणार आहे.

या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून, या टीझरमध्ये प्रतापगडावर फडकणारा भगवा झेंडा, शिवरायांचा रक्तानं माखलेला हात, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखं यांसारखे चित्तथरारक अनुभव टीझरमधून आपल्याला पाहायला मिळतायत. ‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. मुंबई मुवी स्टुडिओजचे निर्माते नितीन केणी म्हणाले की, ‘पावनखिंड’ चित्रपटाचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता 22 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला ही प्रेक्षक भरभरून प्रेम देतील, असा विश्वास आम्हाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -