मिझोरामच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पदावरून हटवले

मिझोरामच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पदावरून हटवले

निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने मिझोरामचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. बी. शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोराममध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शशांक यांना हटवण्याची मागणी होत होती. राजधानी ऐझॉलसह अनेक शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी शशांक यांना हटवण्यासाठी निदर्शनंही केली होती. निवडणूक अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी जोर धरत असतानाच निवडणूक आयोगाची समिती मिझोराममध्ये दाखल झाली होती. त्यांच्या अहवालानंतर निवडणूक अधिकाऱ्याला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांतच मिझोराम विनधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. हे मतदान २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मुख्य अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी 

मिझोरामसाठी नवीन मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची निवड करण्याकरता मुख्य सचिवांकडे नव्या पॅनलची मागणीही केली आहे. मिझोरामच्या सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी निवडणूक अधिकारी एस. बी. शशांक यांना हटवण्यासाठी त्रिपुरातील शरणार्थी ब्रू समुदायातील लोकांना मिझोरामच्या सीमेमध्ये मतदान करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगानं दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. निवडणूक आयोगानं राज्याचे प्रधान सचिव (गृह) ललनुनमाविया चुआऊंगो यांनाही हटवलं आहे. त्यानंतरच शशांक यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. चुआऊंगो हे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याची शशांक यांनी तक्रार केली होती.

पाच राज्यांमध्ये मतदान 

यासंबंधी मुख्यमंत्री ललथनहवला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून त्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची तक्रार केली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. २०१८ ची विधानसभा निवडणूक सुरळीत होण्यासाठी शशांक यांना तात्काळ पदावरून हटवण्याची गरज असल्याचं मत मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रातून मांडलं होतं. तसेच २८ नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये मतदान होणार असून राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतही निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यांतील मतदानाची मोजणी ११ डिसेंबरला होणार आहे.

First Published on: November 10, 2018 4:45 PM
Exit mobile version