नाचणाऱ्या नोरा फतेहीला आईने दिला चपलेचा प्रसाद,पाहा व्हिडिओ

नाचणाऱ्या नोरा फतेहीला आईने दिला चपलेचा प्रसाद,पाहा व्हिडिओ

नाचणाऱ्या नोरा फतेहला आईने दिला चपलेचा प्रसाद, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेह तिच्या हॉट,सेक्सी लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या बोल्ड अंदाजाने ती नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या नोरा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नोरा फतेह नाचताना दिसत आहे. नारो तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहेच. ती नेहमीच तिच्या डान्सच्या अदा तिच्या व्हिडिओमधून प्रेक्षकांना दाखवत असते. तिचा डान्स तिच्या चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडतो. अनेक टिव्ही शो आणि सिनेमात नोराचा परफॉरमन्स पाहिला आहे. नोराने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे ते चांगलीच चर्चेत आली आहे.

नोराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोरा त्या व्हिडिओमध्ये बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. मात्र तिच्या आईला काही तिचा हा नाच काही आवडेला नाही. नोरा नाचत असताना किचनमध्ये असेलेली तिची आई चक्क तिला चप्पल फेकून मारताना दिसत आहे. लोक कोरोनामुळे हैराण आहेत आणि तुला डान्स शिवाय काही सुचत नाही, असे म्हणत नोराची आई व्हिडिओ बंद करते. या व्हिडिओला नेटकऱ्यांची सध्या चांगलीच पसंती मिळत आहे.

नोरा नेहमीत सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या अनेक चर्चा रोज होत असतात. काही दिवसांपूर्वीच नोरा करिना आणि सैफचा मुलगा तैमूर याच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावरुन नोराला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. स्री, बाटला हाऊस, कमरिया या सिनेमात नोरा झळकली होती. तिचे ओ साकी साकी हे गाणं चांगलच हिट झाले होते.


हेही वाचा – ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्’ लवकरच

First Published on: February 2, 2021 3:16 PM
Exit mobile version