घरमनोरंजन‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्’ लवकरच

‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्’ लवकरच

Subscribe

गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निघून गेले आहे. पण, आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय. महाराष्ट्राचा सुपरस्टार सुमीत राघवन!! आणि रसिकांची टेन्शन्स दूर करण्यासाठी हास्याचा ‘अनलॅाक’ करत कॅामेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार आहे. अतरंगी कलाकारांची सतरंगी धमाल घेऊन दर्जेदार आणि निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. एका धम्माल विनोदी शो सह. ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्’ ७ फेब्रुवारीपासून दर रविवारी संध्या ७ वाजता पाहता येणार आहे.

दमदार अवलिया हजेरी लावणार

कॅामेडीच्या या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये मराठी रंगभूमी गाजवणारे अनेक दमदार अवलिया कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. आपल्या धमाल अभिनयाने हास्याची धुंवाधार आतषबाजी करण्याची तर कधीकधी हसतांहसतां प्रेक्षकांच्या मनाला पाझर फोडण्याची ताकद या कलावंतांच्या अभिनयात आहे. प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर म्हणजेच नंदकिशोर चौघुले, माधवी जुवेकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, अभिजीत चव्हाण, शशिकांत केरकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, प्रथमेश शिवलकर, शर्मेश बेतकर, “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमधील तात्या अर्थात अक्षय टांक, मंदार मांडवकर, दिशा दानडे यांच्या सारख्या एकापेक्षा एक सरस आणि दमदार विनोदनिर्मिती करणाऱ्या नामांकित हास्यसम्राटांबरोबरच तितक्याच दमदार विनोदी संहिता लेखकांची दमदार खेळी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती संहिता क्रिएशन्स करत असून आशिष पाथरे सारखा हरहुन्नरी कलावंत, रंगभूमीवर वावरणारा रंगकर्मी या शोचं लेखन, दिग्दर्शन सांभाळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमृता फडणवीसांची बजेट प्रतिक्रिया, चूक शोधून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -