भाऊसाहेब रंगारी यांच्या जीवनावर चित्रपट

भाऊसाहेब रंगारी यांच्या जीवनावर चित्रपट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक मानले जातात. एक जहाल क्रांतिकारक म्हणून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे त्यांनी उभारलेले रंगारी भवन याचे प्रतिक आहे. १८९४ च्या हिंदु-मुस्लीम दंग्यात त्यांची विशेष भूमिका होती.

अत्यंत खतरनाक व उपद्रवी, अशा शब्दांत इंग्रजांच्या गुप्तचर खात्याने त्यांचे वर्णन केले होते. अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माता राजू रुपारेलिया चित्रपट काढणार आहेत. पुढील गणेशोत्सवात तो प्रदर्शित होणार आहे. त्याच्या पोस्टर अनावरणाचा सोहळा पुणे येथे भाऊसाहेब रंगारी यांच्या गणेशोत्सवात करण्यात आला. सेंच्युरी मीडियाचे राजू रुपारेलिया यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन गणेश कोळपकर आणि कुमार रवळनाथ गावडा यांनी केले आहे. सूरज रेणुसे यांच्या प्रतिबिंब फिल्मची ही प्रस्तुती आहे.

First Published on: September 26, 2018 3:15 AM
Exit mobile version