बच्चे कंपनीसाठी GoodNews; ‘शक्तिमान’ लवकरच येणार मोठ्या पडद्यावर!

बच्चे कंपनीसाठी GoodNews; ‘शक्तिमान’ लवकरच येणार मोठ्या पडद्यावर!

बच्चे कंपनीचा सर्वाधिक आवडता कार्यक्रम ‘शक्तीमान’ प्रत्येक घरा-घरात आवडीचा कार्यक्रम होता. पूर्वी शक्तीमान लागले की, लहान मुलं टीव्हीजवळ बसून राहायचे त्यानंतर आता लॉकडाउनच्या वेळी ‘शक्तीमान’ पुन्हा सुरू झाले होते. तेव्हा पुन्हा अनेक जण बालपणीतील आपल्या जुन्या आठवणीत रमले होते. मात्र आता शक्तीमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ‘शक्तीमान’ मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यावर चित्रपट बनणार आहे आणि तो तीन भागात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तीन भागात बनविला जाणार चित्रपट

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश खन्ना यांनी पुन्हा एकदा ‘शक्तीमान’ प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘शक्तिमान’ वर एक चित्रपट बनविला जाईल, असे सांगितले आहे. हा चित्रपट तीन भागात बनविला जाणार असून ‘शक्तिमान’ चा सुरुवातीच्या प्रवासापासून ते शेवटपर्यंत हा चित्रपट आणि त्याची कथा असणार आहे.  हा चित्रपट ‘कृष’ आणि ‘रा.वन’ पेक्षा मोठा असेल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे बजेटही मोठे असेल आणि त्याचे प्रदर्शितही मोठ्या प्रमाणात केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबद्दल मुकेश खन्ना म्हणाले की, हे स्वप्नापेक्षा कमी नाही. आम्ही या चित्रपटासाठी मोठा चेहरा शोधत आहोत. तो अंतिम होईपर्यंत आम्ही कोणतीही घोषणा करणार नाही.

तसेच, ‘शक्तीमान’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. हा चित्रपट मुलांच्या दृष्टीने त्यांच्या आवडीनुसार केला जाणार आहे. मात्र मुकेश खन्ना या चित्रपटात शक्तीमानची भूमिका साकारणार आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?; पायल घोष वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात

First Published on: October 2, 2020 2:58 PM
Exit mobile version