मुखबिर ‘द स्टोरी ऑफ अ स्पाय’मधून उलगडणार भारताच्या इतिहासाची पानं, ट्रेलर रिलीज

मुखबिर ‘द स्टोरी ऑफ अ स्पाय’मधून उलगडणार भारताच्या इतिहासाची पानं, ट्रेलर रिलीज

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज, आदिल हुसेन आणि हर्ष छाया यांची आगामी हेरगिरीसंबंधीत थ्रिलर वेब सिरीज “मुखबीर: द स्टोरी ऑफ अ स्पाय” साठी एकत्र आले आहेत. या वेबसिरीजचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. हे तिनही स्टार स्ट्रीमिंग शोमध्ये हेडलाइनिंग करताना दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये पाकिस्तानमधील भारताच्या गुप्तहेराची कहाणी दाखवण्यात आली आहे, जो देशाला वाचवण्यासाठी आणि भारत-पाकिस्तान 1965 च्या युद्धाला भारताच्या बाजूने जिंकण्यासाठी आपले प्राण पणला लावतो. या सिरीजचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे, जो जयप्रद देसाई यांच्यासह ‘नाम शबाना’ आणि ‘स्पेशल ऑप्स’साठी ओळखला जातो.

ट्रेलर रिलीजच्या प्रसंगी अभिनेते प्रकाश राज म्हणाले, मुखबिरमधून भारताच्या गुप्तहेरांचे शौर्य आणि बलिदानाचा गौरव केला जातो. मला अशा उल्लेखनीय सिरीजचा एक भाग होत असल्याने आनंद होत आहे. ही सिरीज अशावेळच्या भारताच्या भवितव्याचा शोध घेते, जेव्हा देशाला दुसरे युद्ध परवडत नव्हते आणि त्याचे भवितव्य शत्रू देशातील गुप्त एजंटच्या नेतृत्वाखालील धोकादायक मोहिमेवर अवलंबून होते. आदिल हुसैन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मी विशेषत: अशा कथांकडे वळतो ज्या प्रेक्षकांना प्रेरणा देतात. तसेच सामान्यांच्या पलीकडे जाऊन प्रेरित करतात. ‘मुखबिर’ ही एक अशी कथा आहे जी जगभरातील प्रत्येक भारतीयाला आवडेल.

याशिवाय शोमध्ये झैन खान दुर्रानी, बरखा सेनगुप्ता, झोया अफरोज, सत्यदीप मिश्रा आणि करण ओबेरॉय हे कलाकार झळकणार आहेत. व्हिक्टर टँगो एंटरटेनमेंट निर्मित ही सीरिज देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या आणि सावलीत जगणार्‍या नायकांना श्रद्धांजली आहे. 8 एपिसोडची ही सीरिज 11 नोव्हेंबर 2022 पासून OTT प्लॅटफॉर्म G5 वर रिलीज होईल.


डायबिटीस असूनही बटाटा खातायं? मग अगोदर वाचा डॉक्टरांचा सल्ला

First Published on: October 31, 2022 8:52 PM
Exit mobile version