‘मुळशी पॅटर्न’ची तीन दिवसांत खतररssss..नाक कमाई

‘मुळशी पॅटर्न’ची तीन दिवसांत खतररssss..नाक कमाई

मुळशी पॅटर्न

गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारीत लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. २३ नोव्हेंबरला राज्यभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. एका तालुक्याची नाही अख्ख्या देशाची गोष्ट अशी टॅग लाईन या चित्रपटाला देण्यात आली आहे. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवा…,असा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारीत आहे.

स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग 

या चित्रपटाचे पटकथा, लेखन, दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, स्वतः प्रवीण तरडे यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ च्या ट्रेलरमुळे चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. अपेक्षेनुसार चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे त्याच्या कमाईवरून पाहायला मिळत आहे. सध्या मराठीतील आणि काशिनाथ घाणेकर आणि नाळ हे दोन चित्रपट अजुनही थिएटरमध्ये टिकून असताना मुळशी पॅटर्न या चित्रपटानेही त्याचा वेगळा प्रेक्षकवर्ग बनवण्यात यश मिळवले आहे. असेच या कमाईतून दिसून येते.

वाचा : मुळशी पॅटर्नला प्रेक्षकांची पसंती

वाचा : हतबल परिस्थितीतल्या गुन्हेगारीचा ‘मुळशी पॅटर्न’

वाचा : ‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर हल्ला

First Published on: November 26, 2018 8:23 PM
Exit mobile version