मुंबईच्या ट्रॅफिक कोंडीवर भडकले शंकर महादेवन म्हणाले..

मुंबईच्या ट्रॅफिक कोंडीवर भडकले शंकर महादेवन म्हणाले..

शंकर महादेवन

मुंबईत पावसाचे आगमन झाले की दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांचे पुनरुज्जीवन होते. बघताबघता त्यांची संख्या वाढते आणि ते मुंबईकरांच्या जीवावर उठतात. त्यांची उत्पत्ती रोखण्यास सरकार, प्रशासन अपयशी ठरते. यावेळी मात्र या खड्ड्यांच्याविरोधात मराठी कलाकारांनी आवाज उठवला आहे. खड्यांप्रमाणे जेष्ठ गायक,संगीतकार शंकर महादेवन यांनी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. त्यांना त्यांच्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग रद्द करावं लागलं आहे. शंकर महादेवन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. देखील सोशलमिडीयावर संताप व्यक्त केला आहे.

“नवी मुंबईहून सकाळी १० वाजता मी रेकॉर्डिंगसाठी निघालो. दुपारचे तीन वाजले तरीदेखील कामाच्या ठिकाणी योग्य वेळेत पोहोचू शकलो नाही. अंधेरीलाच पोहोचायला जवळपास ३ वाजते. त्यामुळे आज मला हे रेकॉर्डिंग रद्द करावं लागलं. मला समजत नाहीये की, मुंबईच्या या ट्रॅफिकमध्ये आपण आपल्या कामाचं नियोजन नक्की करावं तरी कसं”, असं ट्विट शंकर महादेवन यांनी केलं आहे.

काल देखील मराठी कलाकारांनी रस्त्यांवरील खड्ड्यांवर संताप व्यक्त केला. अभिनेता सुबोध भावे, अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात सोशल मिडियावरून नाराजी व्यक्त केली आहे.

First Published on: September 17, 2019 10:18 AM
Exit mobile version