मला स्त्री भूमिकेत पाहून माझी मुलगी झाली होती नाराज, पण… नवाजुद्दीन सिद्दीकीचा खुलासा

मला स्त्री भूमिकेत पाहून माझी मुलगी झाली होती नाराज, पण… नवाजुद्दीन सिद्दीकीचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्यांच्या चित्रपटांतील विविध आणि उत्तम अभिनयामुळे ओळखला जातो. आपल्या चित्रपटातील दमदार अभिनयाने तो नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरतो. दरम्यान, नुकताच मागील काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी चित्रपटातील लूक समोर आला आहे. ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी स्त्री वेशात दिसून येत आहे. मात्र त्याच्या हा लूक पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, या लूक बाबत नवाजुद्दीन सिद्घीकीने आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

चित्रपटातील लूकवर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया
नवाजुद्दीन सिद्दीकीचा स्त्री वेशातील लूकची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या भूमिकेबाबत एका वृत्तपत्राशी चर्चा करत असताना म्हणाला की, “आम्ही ‘हड्डी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटामध्ये माझ्या दोन भूमिका असणार आहेत. ‘हड्डी’ चित्रपटामध्ये मी एक स्त्री आणि ट्रांसजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटामध्ये माझ्या दोन भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षत शर्मा या चित्रपटाला गेल्या ४ वर्षांपासून बनवू इच्छित होते. मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो.”

नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक पाहून मुलगी झाली नाराज
नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितलं की, मला या लूकसाठी तयार होण्यासाठी जवळपास तीन तास लागतात. मात्र, जेव्हा माझ्या मुलीने मला या लूकमध्ये पाहिलं. तेव्हा ती नाराज झाली. परंतु आता तिला ठाऊक आहे की, हे फक्त चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी आहे.

नवाजुद्दीनचा लूकची सोशल मीडियावर चर्चा
नुकत्याच काही दिवसांपूर्वी नवाजद्दीनच्या आगामी ‘हड्डी’ चित्रपटाची पहिली झलक शेअर करण्यात आली. यामध्ये नवाजुद्दीन मॉडर्न लेडीच्या वेशभूषेत दिसत होता. दरम्यान, नवाजुद्दीनचा हा लूक पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. इतकंच नव्हे तर, नवाजुद्दीनच्या या लूकचू अनेकजण अभिनेत्री अर्चना पूरन सिंहसोबत देखील तुलना करू लागले होते. अनेकांच्या मते, नवाजुद्दीन स्त्री वेशभूषेत हूबेहूब अर्चना पूरन सिंह सारखे दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या या प्रकारचे अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.

या दिवशी प्रदर्शित होणार नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ चित्रपट
नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसून येईल.


हेही वाचा :नवाजुद्दीन सिद्दीकीचा स्त्री वेशातील नवा लूक, अर्चना पूरणसिंहसोबत तुलना

First Published on: August 29, 2022 11:29 AM
Exit mobile version