चैत्या ‘जाऊ दे ना व’ म्हणत झाला ‘छूमंतर’

चैत्या ‘जाऊ दे ना व’ म्हणत झाला ‘छूमंतर’

चैत्या ‘जाऊ दे ना व' म्हणत झाला ‘छूमंतर’

लॉकडाऊन शिथील झाल्यावर आणि सरकारकडून चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेक सिनेमांच्या, मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली. मराठी सिनेमांनी देखील अनेक ठिकाणी जाऊन योग्य ती काळजी घेऊन चित्रिकरण सुरू केले आणि विशेष करून ‘छूमंतर’ या मराठी सिनेमाची चर्चा सर्वत्र जोरदार झाली. कारणही तसे विशेषच आहे. नितीन प्रकाश वैद्य निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ चे चित्रिकरण लंडनमध्ये करण्यात आले होते. सध्याच्या काळात परदेशात जाऊन शूटिंग करणे हे तस् चॅलेंजिंगच आहे, पण टीम वर्कमुळे शूटिंग यशस्वीरित्या पार पडले. या सिनेमाचे सरप्राईज काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर उलगडले आहे. ते सरप्राईज म्हणजे महाराष्ट्राचा लाडका ‘चैत्या’ उर्फ ‘नाळ’ फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळे देखील या सिनेमाचा एक भाग आहे.


हेही वाचा – आता नेटफ्लिक्सवर फ्रीमध्ये पाहा वेबसीरिज आणि चित्रपट!


 

First Published on: November 20, 2020 4:54 PM
Exit mobile version