Lockdown – घरात मालिका शुटींगबरोबर नम्रता आवटे जपतेय आईपण!

Lockdown – घरात मालिका शुटींगबरोबर नम्रता आवटे जपतेय आईपण!

आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही लॉकडाऊनमध्ये सुरू होणारी सोनी मराठी वाहिनीवरील पहिली मालिका आहे. या मालिकेसाठी प्रत्येक कलाकार आपल्या घरी बसूनच आपापल्या मोबाईल फोन वरून शूटिंग करत आहेत. एकूण १६ कलाकार या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली नम्रता संभेराव सुद्धा प्रेक्षकांना या मालिकेत ललिता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसलr.

नम्रताचा घरून शूट करतानाचा एक व्हिडीओ मध्ये सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. नम्रताला रुद्राज नावाचा एक वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे छोटं बाळ घरात असताना शूट करताना बऱ्याच गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात. तिच्या नवऱ्याला बऱ्यापैकी या क्षेत्राची आवड असल्याने आणि थोडं-बहुत तांत्रिक ज्ञान असल्याने हे घरून शूटिंग करणं नम्रतासाठी थोडं सुकर झालं आहे. तिचं बाळ झोपत त्या वेळेत नम्रता बरंच शूटिंग संपवून घेते, घरी सासूबाई देखील असल्याने त्याही बाळाची काळजी घेतात आणि आम्ही शूटिंग करू शकतो असं नम्रता म्हणते.

‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या लॉकडाऊनमध्ये शूट झालेल्या मालिकेचे २ भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत जे प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरले असल्याचे प्रेक्षक प्रतिक्रियांवरून कळत आहे.

सध्या या मालिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. कारण लॉकडाऊनच्या या कठीण प्रसंगात हे कलाकार घरात बसून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नम्रताने सांगितलेल्या या परिस्थितीवरून नक्कीच आपल्याला अंदाज येईल की घरात राहून शूट करणं सोप्प नाहीये.


हे ही वाचा – आलं आलं कोरोना स्पेशल वेडिंग पॅकेज आलं….


 

First Published on: May 28, 2020 1:45 PM
Exit mobile version