आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चे नरेंद्र मोदींकडून कौतुक

आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चे नरेंद्र मोदींकडून  कौतुक

‘रहना है तेरे दिलमें’ फेम अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ची सर्वत्र चर्चा होत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्त्रो) शास्त्रज्ञ एस. नंबी नारायण यांच्य जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. अभिनेता आर. माधवन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून त्यानेच चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी आर. माधवनचे अनेक स्तरावरुन कौतुक होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाची दखल घेतली आहे. सोमवारी आर. माधवन आणि शास्त्रज्ञ एस. नंबी नारायण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यानंतर ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाबात मोदींनी एक ट्विट केले, ”आर. मधवन आणि प्रतिभावंत नंबी नारायण यांना भेटून मला आनंद झाला. या चित्रपटात एक महत्तपपूर्ण विषय आहे जो लोकांनी माहित करुन घेतला पाहिजे. आपल्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी देशासाठी महान बलिदान दिले आहे. ज्याची झलक रॉकेट्री च्या क्लीपमध्ये दिसली.”


हे वाचा-  फोर्ब्स च्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत किम कार्दशियनची वर्ण

First Published on: April 7, 2021 4:12 PM
Exit mobile version