नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला पत्र लिहून आईच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला पत्र लिहून आईच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला पत्र लिहून आईच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

बॉलिवूड (bollywood)अभिनेता अक्षय कुमारची (Akshay kumar)आई अरुणा भाटिया यांचे 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. (Akshay kumar mother)दरम्यान,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी अक्षय कुमारला पत्र लिहून आईच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अक्षय कुमारने पीएम मोदींचे हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.(Narendra Modi Writes Heartfelt letter to Akshay Kumar offering his condolence on her mother)

पीएम मोदींनी अक्षय कुमारला पाठवलेल्या या पत्रात लिहिले आहे- ‘ चांगल झालं असतं जर हे पत्र मी तुला कधीही लिहिलं नसतं. आदर्श जगात अशी वेळ कधीही येऊ नये.  आई अरुणा भाटिया यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्या दिवशी मी तुझ्याशी बोललो होते तेव्हा तू अत्यंत उदास होता. तू तुझ्याभावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या, ‘ती माझी सर्वकाही होती. आज मला असे असह्य वेदना होत आहेत ज्याचे मी वर्णन करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मेहनत आणि समर्पणाने यश मिळवले आहे.तुमच्या प्रवासात तुम्ही अनेक अडचणींना संधींमध्ये बदलले, तुम्ही हे सर्व तुमच्या मूल्यांद्वारे आणि आत्मशक्तीद्वारे केले. तुम्हाला हे सर्व धडे तुमच्या पालकांकडून मिळाले.

पीएम मोदी पुढे लिहितात, ‘जेव्हा तू सिनेकारकीर्द सुरू केली होती, तेव्हा लोक तुझ्याबद्दल साशंक नजरने पाहत होते. त्याच वेळी, काही प्रकारचे चांगले लोकंही असतील. या काळात तुझी आई तुझ्याबरोबर डोंगरासारखी उभी राहिली. यशाची उंची असो किंवा अपयशाचे धक्के असो, त्यांनी नेहमी तूला साथ दिली. त्यांनी न नेहमी दयाळू आणि नम्र राहण्यास शिकवेल तसेच तुझ्यामध्ये समाजसेवेची सवयही निर्माण केली, जी तुझ्या सामाजिक कार्यात दिसून येते.

पत्रात पंतप्रधान पुढे लिहितात, ‘तू ज्या प्रकारे त्यांची काळजी घेतली ती प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. तिचा लाडका मुलगा देशातील सर्वात प्रिय आणि बहुमुखी अभिनेता आहे हे जाणून तिने जगाचा निरोप घेतला.

पत्राच्या शेवटी, पंतप्रधानांनी लिहिले, ‘दुःखाच्या या क्षणात हे शब्द तुझ्याशी न्याय करू शकत नाहीत. त्यांच्या आठवणी आणि वारसा नेहमी आपल्यासोबत ठेवा. त्यांचा नेहमी अभिमान बाळग. या दु:खाच्या वेळी माझी आणि कुटुंबाच्या सहानुभूती आहे. ओम शांती. ‘


हे हि वाचा – ‘बबिता जी’ने सोडले मौन म्हणाली, लोकांना माझ्या सन्मानाला धक्का लावण्यास 13 मिनिटेही लागली नाही

First Published on: September 12, 2021 5:05 PM
Exit mobile version