नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, मुलगा विवानने शेअर केला फोटो

नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, मुलगा विवानने शेअर केला फोटो

नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, मुलगा विवानने शेअर केला फोटो

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)  यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना २९ जून रोजी मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता एक आठवड्यानंतर नसीरुद्दीन शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांचा मूलगा विवान शाह (Vivan Shah) यांनी त्याच्या सोशल मीडियावरून त्यांचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. (Naseeruddin Shah discharged from hospital, photo shared by son Vivan Shah)  नसीरुद्दीन शाह यांना निमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याच्या फुफ्फुसात पॅच असल्याचे आढळले. नसीरुद्दीन शाह यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि मुलगा विवान त्यांच्या सोबत होते. नसीरुद्दीन शाह यांनी रुग्णालयात योग्य उपचार घेऊन ते आता सुखरुप घरी परतले आहेत.

 

नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती स्थिरावल्याने त्यांना डॉक्टरांनी घरी जाण्यास परवानगी दिली. आज सकाळीच नसीरुद्दीन यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. त्यांचा मुलगा विवान याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नसीरुद्दीन यांचा फोटो शेअर करत ते बरे घरी परतल्याची माहिती दिली. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रत्ना पाठकही दिसत आहेत. पोस्ट शेअर करत, ‘बॅक होम’, त्यांना आज सकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय’, असे म्हणत विवान शाह यांनी फोटो शेअर केला आहे.

ज्या दिवशी नसीरुद्दीन शाह यांना मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच दिवशी अभिनेते दिलीप कुमार यांना देखील दाखल करण्यात आले होते. मात्र आज दिलीप कुमार यांचे दु:ख निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


हेही वाचा – ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार सुपुर्द ए खाक, चाहत्यांनी भरल्या डोळ्याने दिला अखेरचा निरोप

 

 

 

First Published on: July 7, 2021 8:20 PM
Exit mobile version