नवज्योत सिंह सिद्धूंच्या पत्नीला कॅन्सरचे निदान; पतीसाठी भावनिक पोस्ट, म्हणाल्या…

नवज्योत सिंह सिद्धूंच्या पत्नीला कॅन्सरचे निदान; पतीसाठी भावनिक पोस्ट, म्हणाल्या…

नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला कॅन्सरचे निदान

काॅंग्रेसचे नेते, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी क्रिकेटर आणि द कपिल शर्मा शोमध्ये शायरीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे नवज्योत सिंग सिद्धू सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नी नवजोत कौर यांनी ट्विट करत त्यांना स्टेज 2 चा कॅन्सर असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी पुढे म्हटले की, सिद्धू परत येण्याची त्या वाट पाहू शकत नाहीत. सिद्धू रोड रेज प्रकरणी एक वर्षाचा तुरुंगवास भोगत असून ते पटियाला सेंट्रल जेलमध्ये आहेत.

सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. रोड रेज डेथ या  ३४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना ही शिक्षा सुनावली आहे.

नवजोत कौर यांचे पतीसाठी भावनिक ट्वीट

नवजोत कौर यांनी पती नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासाठी ट्वीट केले आहे. जो गुन्हा कधी केलाच नाही, त्याची शिक्षा ते भोगत आहेत. या गुन्ह्यातील दोषींना मात्र माफ करण्यात आले. मी रोज तुमची वाट पाहते. तुमचं दु:ख इतरांबरोबर शेअर करते. वाईट परिस्थितीत सुधारणा होईल, अशी मला आशा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

नवजोत कौर म्हणतात की, सत्य खूप शक्तिशाली आहे. पण तुमच्या वेळेची परीक्षा घेते. कलियुग. स्टेज 2 च्या कॅन्सरचे निदान झाल्यामुळे तुमची वाट पाहू शकत नाही. आज माझी सर्जरी आहे. यासाठी कोणालाही दोष द्यायचा नाही. कारण ही देवाची इच्छा आहे. परफेक्ट, असे म्हणत नवजोत कौर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘या’ प्रकरणात झाली शिक्षा

रोड रेज डेथ या  ३४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 1988 ची आहे. सिद्धूची पंजाबमध्ये रस्त्यात भांडणे झाली. त्यांच्या मारहाणीमुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.

( हेही वाचा: चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन शूट करताना अक्षय कुमारच्या पायाला दुखापत )

क्रिकेटपटू ते राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रवास

नवज्योत सिद्धू यांनी कॉमेंट्री आणि टीव्ही जगतात खूप नाव कमावले आहे. ते पंजाबचे पर्यटन मंत्रीही राहिले आहेत. अमृतसरमधून लोकसभा सदस्य राहिलेल्या सिद्धूंची खरी ओळख क्रिकेटची आहे. त्यांचे वडील सरदार भगवंत सिंग हे क्रिकेटपटू होते. आपल्या मुलाने आपल्यासारखा खेळाडू व्हावा, अशी त्यांची इच्छा होती.

वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सिद्धूने 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. ते पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळले होते. सिद्धू यांनी एकूण 51 कसोटी सामने आणि 136 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत 3202 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 4413 धावा केल्या आहेत. तब्बल 17 वर्षांनी 1999 मध्ये ते क्रिकेटमधून निवृत्ती झाले.

First Published on: March 24, 2023 2:07 PM
Exit mobile version