नवाझुद्दीन सिद्दीकीला मिळाला; ‘१२ वा एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्ड’

नवाझुद्दीन सिद्दीकीला मिळाला; ‘१२ वा एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्ड’

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोच्या भूमिकेत

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याला ‘१२ वा एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्ड’ (एपीएसए) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नवाझुद्दीनला दुसऱ्यांदा हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच ‘फोटोग्राम’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ‘सनडांनस फिल्म फेस्टिव्हल २०१९’ मध्ये होणार असल्याचेही त्याने जाहीर केले आहे. त्यामुळे नवाजसाठी हा आनंदाचा डबल धमाका आहे. नवाझुद्दीनला त्याच्या ‘मंटो चित्रपटातील भूमिकेमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः नवाझुद्दीन याने त्याच्या ट्विटर अकाऊंटरवरुन दिली आहे.

वाचा : सआदत हसन ‘मंटो’चा जीवनपट रुपेरी पडद्यावर

‘मंटो’ चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार 

दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळत असल्यामुळे हा गौरव खुपच खास असल्याचे नवाजने म्हटले आहे. तसेच ‘मंटो’ या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेतील निवडीबाबत त्याने दिग्दर्शक नंदिता दास यांचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर समीक्षक आणि प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलेल्या ‘मंटो’ चित्रपटाचे २०१८ ला ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये प्रीमियर करण्यात आले होते. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक सआदत हसन ‘मंटो’ यांच्या जीवनावर आधारीत आहे. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात आला होता.

वाचा : नवाजुद्दीनच्या आयुष्यात ‘फिरंगी’ सुंदरीची एंट्री?

First Published on: November 30, 2018 7:51 PM
Exit mobile version