नेहा कक्कडची लगीन घाई, अखेर मुहूर्त ठरला

नेहा कक्कडची लगीन घाई, अखेर मुहूर्त ठरला

नेहा कक्कडची लगीन घाई, अखेर मुहूर्त ठरला

आजच्या तरूणाईला आपल्या गाण्याने वेड लावणारी गायिका नेहा कक्कड चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड येत्या १४ फेब्रुवारीला आदित्य नारायण सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. नेहाच्या लग्नाची चर्चा सुरू असताना, दोन दिवसांपूर्वीच टोनी कक्कडने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केला होता. नेहा कक्कड, आदित्य नारायण आणि टोनी कक्कड हे विवाहा विषयी चर्चा करताना दिसत आहेत.

 

‘इंडियन आइडल ११’ हा रियालिटी शो मोठ्या प्रमाणात गाजला या शोमध्ये नेहा कक्कडने परीक्षकाची भूमिका बजावली होती. तसेच कार्यक्रमाचे निवेदन हे आदित्य नारायण करत असताना त्यांच्या विवाहाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर चाहत्यांची उत्सुकता संपली आहे, नेहा येणाऱ्या काही दिवसांतच विवाह बंधनात अडकणार आहे. नेहाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘याद पिया की आने लगी’ या गाण्यावर लिपसिंग करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, यात तिने आपल्या हातात लाल बांगड्यांचा चुडा देखील घातलेला दिसत आहे.

 

‘इंडियन आइडल ११’ हा रियालिटी शो सुरू असताना संपूर्ण नारायण परिवाराने एकत्रित येऊन नेहाला लग्नाची मागणी घातली होती. यावेळी आदित्यचे वडील सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आणि दिपा नारायण यांनी नेहाला आपली सून होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या अनेक चात्यांनी तिला यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

First Published on: February 9, 2020 10:40 AM
Exit mobile version