व्हर्जिनीटीबाबत अभिनेत्रीनेचा खुलासा म्हणाली…

व्हर्जिनीटीबाबत अभिनेत्रीनेचा खुलासा म्हणाली…

५ जानेवरीला अभिनेत्री नेहा पेंडसे लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड शार्दूलबरोबर तीने लग्न केले. शार्दूल हा एक बिझनेसमन आहे. या दोघांच्या लग्नानंतर या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. यांच्या लग्नानंतर नेहाच्या नवरा शार्दूलचा हा तीसरा विवाह असल्याच्या बातम्या फिरू लागल्या. त्यानंतर सगळीकडेच चर्चेला उधाण आलं. यावर नेहाने आपल्याला त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या आणि मुलांचा काहीच प्रॉब्लेम नसल्याच म्हटलं आहे.

लग्न मोडणे हे काही आजच्या काळात नवीन नाही. करिअर बनवण्याच्या नादात त्याची दोन्ही लग्न मोडली. ही काही फार मोठी गोष्ट नाही. शार्दूलचा दोनदा घटस्फोट झाला असेल, पण मी काही व्हर्जिन नाही. दोनदा संसार मोडल्यानंतर त्याने माझ्याशी लग्न केलय. याला हिंमत लागते. खरे तर यासाठी त्याचे कौतूक व्हायला हवे. आम्ही दोघांनी एकमेकांच्या भुतकाळासह एकमेकांचा स्विकार केला आहे. असे नेहा म्हणाली. शार्दूलचे १० वर्षापूर्वी लग्न मोडले, त्यनंतर ५ वर्षानंतर शार्दूलचे लग्न मोडले. तो आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतो. असेही नेहा पुढे म्हणाली.

शार्दूलला भेटण्या आधी मी सुद्धा २ ते ३ वेळा रिलेशनशिपमध्ये होते. मात्र फार काळ ते टिकू शकलं नाही. त्यानंतर मला शार्दूल भेटला. त्याच्याबद्दल सगळं माहित असू नही मी त्याच्याशी लग्न केलं. आता लग्नानंतर लगेचच आम्ही आपापल्या कामात व्यस्त झालो. आम्ही हनूमूनलाही एप्रिलमध्ये जाणार आहोत. आम्ही हनीमूनसाठी जपानला जाणार आहोत.

First Published on: January 17, 2020 10:47 AM
Exit mobile version