अनुराग कश्यपला शारीरिक संबधासारखे बोल्ड प्रश्न विचारताच आलिया कश्यप झाली ट्रोल

अनुराग कश्यपला शारीरिक संबधासारखे बोल्ड प्रश्न विचारताच आलिया कश्यप झाली ट्रोल

अनुराग कश्यपला शारीरिक संबधासारखे बोल्ड प्रश्न विचारताच आलिया कश्यप झाली ट्रोल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची (anurag kashyap)लेक आलिया कश्यप (aaliyah kashyap)सोशल मिडियावर अधिक सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलिया आपले नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनुराग कश्यप आणि आलिया दोघेही नेहमीच सोशल मीडियावर आपले मत सडेतोडपणे मांडताना दिसतात तसेच अनुराग आणि आलिया अनेक बोल्ड विषयावर मोकळेपणाने चर्चा देखील करतात. नुकतच आलियाने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधत अनुराग आणि आलियाची निंदा केली आहे. अनेकांनी तिला लाज वाटायला हवी अशा सुद्धा कमेंट केल्या आहेत.

काय आहे प्रकरण

आलिया सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर म्हणून काम करते. नुकतच आलियाने अनुराग कश्यप सोबत तिच्या यूट्यूब चॅनलवर Asking my dad (anurag kashyap) awkward questions! असा एक व्हिडिओ पोस्ट करत अनेक प्रश्न अनुरागला विचारले. हे सर्व प्रश्न अनुराग तसेच आलियाच्या चाहत्यांनी त्यांना विचारले होते या प्रश्नामध्ये लग्नापुर्वी शारिरीक संबध ठेवणे या विषयावर अनुरागचे मत जाणून घेत त्याला प्रश्न केला. तसेच आलिया म्हणाली जर तुम्हाला कोणी सांगितेल मी गरोदर आहे तर तुम्ही काय बोलणार. असे काही प्रश्न आलियाने अनुरागला विचारले. आलियाच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरत ट्रोलिंग करण्यास सुरूवात केली तर अनेकांनी तिला पाठिंबा दिला असल्याचे आलियाने स्पष्ट केलं आहे.

व्हिडिओ पाहा-

 


हे हि वाचा – बॉलिवूड कलाकारांना महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी साधं ट्विटही करावंस वाटलं नाही, मनसेकडून संताप व्यक्त

First Published on: July 26, 2021 12:48 PM
Exit mobile version