घरताज्या घडामोडीबॉलिवूड कलाकारांना महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी साधं ट्विटही करावंस वाटलं नाही, मनसेकडून संताप व्यक्त

बॉलिवूड कलाकारांना महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी साधं ट्विटही करावंस वाटलं नाही, मनसेकडून संताप व्यक्त

Subscribe

राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा

राज्याला मुळधार पावसानं झोडपून काढलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या कोसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, कोल्हापूरमध्ये पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे पूर आला आहे. तर रायगड सातारामधील गावांत दरड कोसळ्यामुळे मोठी जिवीतहानी झाली आहे. परंतू दुसऱ्या राज्यात पूर परिस्थिती झाल्यावर बॉलिवूड कलाकार ट्विट करत संवेदना व्यक्त करत असतात. परंतू महाराष्ट्रात राहून मोठ्या झालेल्या बॉलिवूडच्या कलाकरांना साधं ट्विटही करावंस वाटल नाही असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत महाराष्ट्रातील बॉलिवूड कलाकारांवर संताप व्यक्त केला आहे. अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ” इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलीवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही. याच आश्यर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरु केलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो” अशा आशयाची पोस्ट अमेय खोपकर यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बॉलिवूड कलाकरांनाही मदत करावी असे आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे. रायगडमधील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे तर हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाची पाहणी केली असून नागरिकांना पुन्हा उभं करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी चिपळूणमध्ये आढावा बैठक घेऊन सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -