कॅटरिना -ऋतिकची जाहिरात बंद करा, Zomato नेटकऱ्यांकडून ट्रोल

कॅटरिना -ऋतिकची जाहिरात बंद करा, Zomato नेटकऱ्यांकडून ट्रोल

कॅटरिना -ऋतिकची जाहिरात बंद करा, Zomato नेटकऱ्यांकडून ट्रोल

कोरोना व्हायरसच्या(corona virus) रुग्णसंख्येत जरी घट होत असली तरीही कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे.  अशातच सोशल मीडियावर तसेच टिव्हीवर झोमॅटोच्या(zomato) एका जाहिरातीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. कारण कोरोना काळता अनेकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागता आहे.तसेच झोमॅटो डिलीव्हरी बॉयचा(zomato delivery boy) पगारात देखील कपात करण्यात आली आहे आणि अशा कठिण परिस्थितीत या जाहीरातीत लोकप्रिय अभिनेत्री कॅटरिना कॅफ(katrina kaif) आणि अभिनेता ऋतिक रोशन(hrutik roshan) झळकत आहे. झोमॅटोने आपली प्रतिमा चमकवण्यासाठी इतक्या महागड्या कलाकारांना जाहिरातीमध्ये मुद्दाम घेतलं आहे. अनेकांनी या जाहिरातीला विरोध करत या जाहिरातीमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप झोमॅटोवर केला आहे. लोकांच्या ओरोप-प्रत्यारोपानंतर झोमॅटोने देखील या जाहिरातीबाबत खुलासा करत लोकांच्या मनातील नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.(netizens troll zomato new add with hritik and katrina)

झोमॅटोने केला खुलासा-

झोमॅटोने सोशल मीडियावर एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करत स्पष्टीकरण दिले आहे की, अनेक लोकांना वाटतेय की आम्ही इतक्या महागड्या सेलिब्रिटींना जाहिरातीमध्ये घेतलं आहे. कारण लोकांचे लक्ष सॅलरी, वर्कींग कंडीशन सारख्या खऱ्या प्रश्नांवर भटकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आमचे डिलव्हरी बॉय इतके व्यस्त असतात कि त्यांच्याकडे 1 मिनिंटाचा देखील वेळ नसतो. पण असे नाहीये कोणत्याही गोष्टीमागे दोन पैलू असतात. तुम्ही फक्त एकच बाजू पाहिली आहे.

जाहिरात डिलव्हरी पार्टनर्सला हिरो बनवण्यासाठी –

झोमॅटो म्हणाला की, ही जाहिरात सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आली आहे. आणि याचे चित्रीकरण दोन महिन्यांपूर्वी झाले आहे. या जाहिरातीमागचा उद्धेश फक्त डिलव्हरी पर्टनरला हिरो बनवणे हा होता.आमच्यासाठी प्रत्येक कस्टमर एकसारखे आहेत. भलेही तो कितीही मोठा सुपरस्टार असो.

डिलव्हरी पार्टनर्सचा आदर-

झोमॅटोच्या मते जाहिरातीत ऋतिक रोशन आणि कॅटरिना कॅफ ज्या प्रमाणे आमच्या डिलीव्हरी पार्टनर सोबत बोलत आहे. त्यांचा आदर करत आहे. लोकांमध्ये देखील या प्रकारची भावना निर्माण व्हावी यासाठी आम्ही या जाहिरातीचा खटाटोप केला आहे.  ही जाहिरात एका सकारात्मक विचाराने तयार केली असून आम्हाला कोणाचाही अनादर करायचा नाहीये.


हे हि वाचा – नुसरत जहाँला रुग्णालयातून डिस्चार्ज, यश दासगुप्ता मुलासह बाहेर पडताना दिसला

First Published on: August 31, 2021 11:07 AM
Exit mobile version