अरुंधतीच्या आयुष्यात येणार जुना मित्र, मालिकेत होणार नव्या पात्राची एंट्री

अरुंधतीच्या आयुष्यात येणार जुना मित्र, मालिकेत होणार नव्या पात्राची एंट्री

अरुंधतीचा आयुष्यात येणार जुना मित्र, मालिकेत होणार नव्या पात्राची एंट्री

स्टार प्रवाहवरील सर्वाधीक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांना भूरळ पाडली. मालिकेत दाखवण्यात आलेली आईची भूमिका प्रत्येकाला आपलीशी वाटू लागली. आई आपल्या घर-संसारासाठी ,मुलांसाठी करत असलेल्या कष्टाची जाणीव सर्वांना व्हावी असा संदेश या मालिकेतून देण्यात आला आहे.मात्र सध्या माालिकेत अनेक उत्कंठावर्धक वळण येत असून अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटानंतर अरुंधती स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याची तयारी करत आहे. दरम्यान , अरुंधती एका संस्थेमध्ये काम करत आहे. यावेळी तीची अनेकांशी ओळख होते.तसेच तिची संस्थेच्या ट्रस्टीसोबत खास गट्टी जमते.(new actor enter in Aai Kuthe Kay Karte marathi serial)

काही काळापासून अरुंधतीच्या आयुष्यात नव्या पात्राची एंट्री होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता या माहितीवर शिक्कामोर्तब झाला असून अभिनेता ओंकार गोवर्धन मालिकेत अरुंधतीच्या मित्राची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. ओकांर आशुतोष ही व्यक्तीरेखा साकारणार असून अरुंधती काम करत असणाऱ्या संस्थेच्या ट्रस्टींचा तो मुलगा असतो. दरम्यान ,आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमन आहे. आता आशुतोषच्या एंट्रीने मालिकेत काय ट्विस्ट अँन्ड टर्न येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आशुतेष केळकर ही भूमिका साकारणारा ओकांर गोवर्धन हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असून आतापर्यंत त्याने अनेक हिट मालिकेत काम केलं आहे. सावित्री जोती या मालिकेतील त्याच्या भूमिकेची चर्चा चांगलीच रंगली होती.गेल्या काही दिवासंपासून ही भूमिका अभिनेत समीर धर्माधिकारी साकारणार असल्याची चर्चा रंगत होती मात्र आता या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे.


हे हि वाचा –  शाहरुख खान होणार दिलीप कुमार यांच्या कोट्यवधी संपत्तीचा मालक ?

First Published on: October 31, 2021 12:52 PM
Exit mobile version