घरमनोरंजनशाहरुख खान होणार दिलीप कुमार यांच्या कोट्यवधी संपत्तीचा मालक ?

शाहरुख खान होणार दिलीप कुमार यांच्या कोट्यवधी संपत्तीचा मालक ?

Subscribe

भारतीय सिनेसृष्टीतील बॉलिवूड इंडस्ट्री(Bollywood) ही सर्वाधीक श्रीमंत व खूप मोठी इंडस्ट्री मानली जाते. भारताच्या इतर राज्यातील इंडस्ट्रीमधील अनेक लोकप्रिय कलाकार देखील बॉलिवूडमध्ये येण्याचे स्वप्न पाहतात. लोकप्रियता, नाव, सर्वाधीक काम या व्यतीरिक्त बॉलिवूड कलाकारांचे मानधान देखील कोट्यवधींच्या घरात असते. काही काळापूर्वी बॉलिवूडमधील लेंजड्री कलाकार दिलीप कुमार(Dilip Kumar) यांचं निधन झालं. यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला. दिलीप कुमार यांना अनेक कलाकार प्रेरणास्थान मानत असे. त्यांच्या अभिनयाची दखल परदेशातही घेतली जायायची. व्यावसायिक आयुष्यासह दिलीपजी यांच्या  व्यक्तीगत आयुष्याची चर्चा तुफान रंगत असे. दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनय कौशल्येच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. दिलीप कुमार तब्बल 6 हजार 800 कोटींचे मालक आहेत. त्यांच्या भावी पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती दिलीपजी यांच्याकडे आहे. मात्र आता या संपत्तीचा वारस बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

दिलीप कुमार यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, त्यांच्या निधनानंतर संपुर्ण संपत्तीची मालक त्यांची पत्नी सायरा बानू असतील. पण शाहरुखचं दिलीप कुमार यांच्यासोबत असलेलं खास नातं पाहता त्याला देखील या संपत्तीत वाटा मिळणार अशी चर्चा यापुर्वी रंगली होती.
दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वेळी शाहरुख दुबईमध्ये चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता. दिलीपजी आणि शाहरुखमध्ये अगदी जवळचे नाते होते. यामुळे त्यांच्या निधनाची बातमी कळताच शाहरुख थेट दुबईहून दिलीपजींच्या घरी पोहोचला. तसेच खुद्द दिलीप कुमार यांनी पूर्वी म्हटले होते की, शाहरुख माझ्या मुलासारखा आहे. आणि शाहरुखही दिलीप कुमार यांना वडिलांसारखे मानत असे. यामुळे दिलीप कुमार यांच्या संपत्तीमध्ये शाहरुखला सुद्दा हिस्सा मिळणार का?, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – Aryan Khan Released : शाहरुखचा बॉडीगार्ड रवी सिंह विरोधात मराठी अभिनेत्रीने गाठले होते पोलिस ठाणे

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -