‘ही’ला बघितल्यावर देवमाणूस मालिकेतील देवीसिंगची शुद्ध हरपणार

‘ही’ला बघितल्यावर देवमाणूस मालिकेतील देवीसिंगची शुद्ध हरपणार

'ही'ला बघितल्यावर देवमाणूस मधल्या देवीसिंगची शुद्ध हरपणार

मालिकेच्या छोटा पडद्यावर फार कमी वेळात प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली देवमाणूस ही मालिका सध्या वेगळ्या वळणार आहे. अनेकांचे खुन करणाऱ्या देवीसिंग ऊर्फ डॉ. अजित कुमार देवला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटला सुरु असताना कोर्टाबाहेर त्यांच्यावर धारदार शस्राने हल्ला होतो. मालिका एक वेगळ वळण घेत असतानाच आत देवी सिंग आपल्या जुळ्या भावाचे डॉक्टर असल्याचे कागदपत्रे स्वत:चे असल्याचे खोटे पुरावे देतो. त्यामुळे आता पुरव्यांअभावी देवीसिंगची  तुरुंगातून सुटका होणार असून मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. मालिकेच्या नवीन भागांचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात देवी सिंगची न्यायलयातून सुटका करताच त्यांच्या समोर एक बाई येते आणि कोणालाच न घाबरणारा माणसांचे खुन करणाऱ्या देवीसिंगची त्या बाईला पाहून शुद्ध हरपते. (New Entry Marathi serial devmanus)  आता मालिकेत ही नवी बाई कोण याविषयी चर्चा रंगली आहे. नव्या पात्रामुळे मालिका आता कोणते नवे वळण घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.


देवमाणूस मालिकेत दमदार एंट्री घेणारी नवी अभिनेत्री कोण याविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नाही तर तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री माधुरी पवार (madhuri pawar ) आहे. अभिनेत्री माधुरी पवार पुन्हा एकदा देवमाणूस या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेत माधुरीच्या या नव्या पात्राला पाहून देवी सिंग बेशुद्ध होताना दाखवले आहे. आता ही व्यक्ती नक्की कोण याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.

अभिनेत्री माधुरी पवार ही उत्तम अभिनेत्री त्याचप्रमाणे उत्तम नृत्यांगणा देखील आहे. अप्सरा आली या कार्यक्रमाची ती विजेती आली. त्यानंतर ‘तुझ्याच जीव रंगला’ या मालिकेत नंदिता गायकवाड ऊर्फ वहिनीसाहेबांच्या भूमिकेत माधुरी दिसली होती. फार कमी वेळात माधुरीची वहिनीसाहेबांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतील उतरली होती. आता देवमाणूस या मालिकेत माधुरी कोणती भूमिका साकारणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


हेही वाचा – सुपरस्टार विजयने टॅक्स नाही भरला, हाय कोर्टाने ठोठावला एक लाख रुपयांचा दंड

 

First Published on: July 13, 2021 8:09 PM
Exit mobile version