‘Bawaal’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी वरुण धवन, जान्हवी कपूरची पॅरिस वारी

‘Bawaal’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी वरुण धवन, जान्हवी कपूरची पॅरिस वारी

'बवाल'साठी वरूण धवन अन् जान्हवी कपूरची पॅरिस वारी

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलीकडेच लग्नबंधनात अडकला. तेव्हापासून वरूण कोणत्याही चित्रपटात हिरोच्या भूमिकेत दिसला नाही. त्यामुळे वरूण धवन गेला कुठेय अशा चर्चा सुरु झाल्यात. अशात वरूणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वरुण धवनने दोन चित्रपट साईन केले आहे. ‘जुग जुग जिओ’ आणि ‘भेदिया’ अशी या चित्रपटांची नावं आहेत. यातच वरूण लवकरचं ‘बवाल’मध्ये झळकणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘बवाल’ हा चित्रपट साजिद नाडियाडवाला निर्मित करत आहेत. या चित्रपटात वरुण धवन अभिनेत्रा जान्हवी कपूरसह मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे ‘बवाल’ या रोमाँटिक आऊटिंगनिमित्त वरुण धवन आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.


विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग चार युरोपियन देशांमध्ये होणार आहे. ज्यात सिटी ऑफ लव्ह पॅरिसचा समावेश आहे. तर भारतातही याचे काही सीन शूट होणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वरुण धवन आणि जान्हवी कपूर सध्या पॅरिस दौऱ्यावर आहेत.

‘बवाल’निमित्त साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक नितेश तिवारी पुन्हा एकत्र काम करत आहेत. या जोडीने छिछोरे हा चित्रपट यशस्वीरित्या रिलीज केला होता. सर्वोत्कृष्ट हिंदी फिचर सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दरम्यान बवाल हा चित्रपट 7 एप्रिल 2023 मध्ये सिनेमागृहात रिलीज होणार आहे.


‘बाहुबली’ प्रभास पुन्हा अनुष्का शेट्टीसह ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स

First Published on: April 1, 2022 2:28 PM
Exit mobile version