घरमनोरंजन'बाहुबली' प्रभास पुन्हा अनुष्का शेट्टीसह 'या' चित्रपटात करणार रोमान्स

‘बाहुबली’ प्रभास पुन्हा अनुष्का शेट्टीसह ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स

Subscribe

प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाचे किस्से जगभर प्रसिद्ध आहेत. या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ही जोडी आता पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करणार आहे. साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मारुती दसारी ‘राजा डिलक्स’ नावाचा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात प्रभास आणि अनुष्काला पुन्हा एकदा रोमान्स करण्याची संधी मिळणार आहे.

हॉरर-कॉमेडी तडका ‘राजा डिलक्स’

मारुती यांचा ‘राजा डिलक्स’ त्यांच्या ‘प्रेमा’ या चित्रपटाप्रमाणे एक हॉरर-कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगण्यात येतेय. तेलुगू सिनेसृष्टीत भरघोस यश मिळालेल्या ‘प्रेमा कथा चित्रम’ हा चित्रपट आता टॉलीवूड व्यतिरिक्त इतर फिल्म इंडस्ट्रीमध्येही लाट निर्माण करतोय. ‘राजा डिलक्स’च्या शूटिंगसाठी दिग्दर्शकाने एकूण 50 चे 2 शेड्युल निश्चित केलेत. म्हणजेच संपूर्ण शूटिंग 50 दिवसांत पूर्ण केले जाईल. हा चित्रपट एक मिक्स मसाला एंटरटेन करणारा असेल. जो सर्व प्रेक्षकांना भागवेल.

- Advertisement -

प्रभास तीन अभिनेत्रींसोबत करणार रोमान्स

या चित्रपटात प्रभास केवळ अनुष्का शेट्टीच नाही तर मालविका मोहनन आणि श्रीलालासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना बाहुबली स्टारला एकत्र पाहण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे. या चित्रपटाला एस.थामन यांनी संगीतदिले असून हा चित्रपट ‘आदिपुरुष’ चित्रपटापूर्वी प्रदर्शित होणार आहे. ‘राजा डिलक्स’मध्ये मेहरीन पिरजादा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता चित्रपटात अनुष्काच्या एन्ट्रीची झाली आहे. सध्या मारुती सध्या गोपीचंद आणि राशी खन्ना स्टारर ‘पक्का कमर्शियल’ च्या पोस्ट-प्रॉडक्शन कामात व्यस्त आहे. तर लवकरच प्रभाससोबत राजा डिलक्सच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

‘राजा डिलक्स’मध्ये प्रभास आणि अनुष्का एकत्र आल्याने चाहते खूप उत्सुक आहेत, त्यामुळे या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास चाहते रस दाखवत आहे. या दोघांमध्ये अफेअर आणि लग्नाच्या बातम्या अनेकदा समोर आल्या, परंतु त्यात कोणतेही तथ्य सिद्ध झाले नाही. पूर्वी हे स्टार्स एकमेकांशी बोलत नाहीत असेही ऐकले होते, पण आता ही जोडी पुन्हा एकत्र आली तर याही अफवा दूर होतील.


आलिया भट्ट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, सलमान, शाहरूखलाही टाकले मागे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -