प्रेमापलिकडचे वास्तव….तुझीच रे!

प्रेमापलिकडचे वास्तव….तुझीच रे!

प्रेम हे हल्ली सैराटमाय झाले आहे. एखादी मुलगी किंवा मुलगा आपल्याला आवडला म्हणजे, हाच आपला जन्मसाथ आहे. अस समजून मागचा पुढचा विचार न करता, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्याचे काय परिणाम होतात ? ते त्यांनाच माहीत. आजच्या या तरुण पिढीला वास्तवतेच भान राहत नाही. त्यांच्या या प्रेमामुळे त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होतात, याचे या कुटुंबावर कसे पडसाद कसे उमटतात. हेच पडसाद तुझीच रे या आगामी चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. प्रवीण राजा दिग्दर्शित हा चित्रपट दि. २१ जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र एकाचवेळी प्रदर्शित होत आहे. सॅंमसन ग्रेशियस यांची कथा असून पटकथा सुरेश बाल्मिकी यांनी लिहिली असून संवाद अजय राणे यांचे आहेत. बेन्सन सॅंमसन ग्रेशियस हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

तुझीच रे च्या निर्मात्या बेला सॅंमसन ग्रेशियस या वसई मधील उद्योजिका आहेत. इजाग्रेस एन्टप्राइजेस या आपल्या कंपनीतर्फे वसईतील बर्‍याच तरुणांना त्यांनी रोजगार प्राप्त करुन दिला आहे. म्युझिकलमानिएक्स या ऑर्केष्ट्राची निर्मिती करून मराठी, हिन्दी आणि ईस्ट इंडियन हा गाण्यांचा कार्यक्रम वसई, पालघर जिल्ह्यात गेली
कित्येक वर्षे करीत आहेत.
तुझीच रे… चित्रपटात तीन गाणी आहेत. ती सॅंमसन ग्रेशियस, सागर खेडेकर, इयन हंट यांनी लिहिली असून संगीत फ्रान्सिस जिगुल यांनी दिले आहे. सावणी रविंद्र, महेंद्र कारले, विवेक नाईक, पल्लवी पाडगावकर, मंगेश शिर्के व इयान हंट यांनी आवाज दिला आहे. छायांकन राजा फडतरे, संकलन दिनेश मेंगडे, कला दिग्दर्शक केशव ठाकुर, ॲक्शन प्रशांत नाईक, नृत्ये शिलपेश तांबे, प्रबोधन पवार आणि पार्श्वसंगीत अनिरुद्ध काळे यांनी दिले आहे॰ तुझीच रे …. प्रियंका यादव, मिलिंद गवळी, सुमुखी पेंडसे , आनंदा कारेकर, प्रतिभा शिंपी, जयू चौंबल, सागर खेडेकर व अक्षय कांबळी या उदोयोन्मुख कलाकाराची महत्वाची भूमिका आहे.

First Published on: June 16, 2019 8:53 AM
Exit mobile version