निक जोनास ‘जुमांजी’मध्ये साकारणार ‘हे’ पात्र

निक जोनास ‘जुमांजी’मध्ये साकारणार ‘हे’ पात्र

प्रसिद्ध अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास आता एका नव्या कारणामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्राशी लग्न केल्यानंतर निक जोनास भारतासह संपूर्ण जगात फेमस झाला. प्रियांका आणि निकच्या शाही लग्नाने जगभरातील माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावरही प्रियांका आणि निक भलतेच व्हायरल झाले. मात्र, प्रियाकांचा पती निक सध्या त्याच्या आमागी चित्रपटामुळे लाईम लाईटमध्ये आला आहे. सुपरहिट हॉलीवूडपट ‘जुमांजी’च्या दुसऱ्या सिक्वेलमध्ये निक एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  लाखो-करोडो चित्रपट प्रेमींवर त्याचा पगडा आहे. दरम्यान,  च्या पुढील भागात निक जोनास 

पाहा : सेटवर उभारला २० कोटींचा ‘वांद्रे – वरळी सी लिंक’

‘वेराइटी डॉट कॉम’ या इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ड्वेन जॉनसन, जॅक ब्लॅक, केविन हार्ट, आणि करेन गिलन हे कलाकारही जुमांजीच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा झळकणार आहेत. या सर्व कलाकारांनी जुमांजीच्या पहिल्या भागातही काम केले आहे. दरम्यान, सिक्वेलच्या निमित्ताने डॅनी डेविटो आणि डॅनी ग्लोवर हे कलाकार जुमांजीच्या टीममध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय  पहिल्या भागातील चार मुलंही या पार्टमध्ये दिसतील. जेक कसदन हे सिक्वेलचं दिग्दर्शन करणार असून, त्यांनीच स्कॉट रोसेनबर्ग आणि जेफ पिंकनर यांच्या मदतीने चित्रपटाची कथा लिहिली आहे. जुमांजी चित्रपटाचे चाहते या नव्या सिक्वेलविषयी उत्सुक असणार यात काहीच शंका नाही.

ऐका : सोनू निगमचं नवं मराठी गाणं

First Published on: February 8, 2019 12:18 PM
Exit mobile version