घरमनोरंजनबाहुबलीसाठी बांधला २० कोटींचा 'वांद्रे - वरळी सी लिंक'

बाहुबलीसाठी बांधला २० कोटींचा ‘वांद्रे – वरळी सी लिंक’

Subscribe

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये तब्बल २० कोटी रुपये खर्च करुन, वांद्रे - वरळी सी लिंकची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आली.

‘बाहुबली’ फेम दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रभासने ‘साहो’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण केल आहे. ‘साहो’मध्ये प्रभाससोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  या चित्रपटाविषयी आणि त्यातील प्रभासच्या भूमिकेविषयी त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे. ‘साहो’मधील प्रभासची एक झलक काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर ही उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. दरम्यान, सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘साहो‘साठी उभारण्यात आलेल्या ‘वांद्रे – वरळी सी लिंक’ची. चित्रपटातील एका सीनमध्ये मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरील एक द‍ृश्य दाखवण्यात आले आहे. या सीनसाठी वांद्रे – वरळी सी लिंकची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आली होती. एका इंग्रजी वेबसाईटने याविषयीचा खुलासा केला आहे.

२० कोटींचा सी लिंक

सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्यक्ष सी लिंकवर शूट करणं शक्य नसल्यामुळे, या भव्यदिव्य सेटची उभारणी करण्यात आली. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये तब्बल २० कोटी रुपये खर्च करुन, सी लिंकची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आली. चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर साबू सिरिल यांनी सी-लिंकची ही प्रतिकृती तयार केली. सी लिंकच्या या प्रतिकृतीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले नसले, तरी या बातमीचा खुलासा झाल्यानंर हा नवा सी लिंक पाहण्याची सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमधून ‘त्या’ची एक झलक पाहायला मिळेल अशी अपेक्षा चाहते करत आहेत.

- Advertisement -
saaho
‘साहो’ चित्रपटाचं पोस्टर

तेलगू, तामिळ आणि हिंदी आशा तीन भाषांमध्ये ‘साहो’ शूट करण्यात आला आहे. एकच चित्रपट तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये शूट करणे, हा प्रयोग भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला आहे. ‘साहो’ चित्रपटाने हा विशेष बहुमान पटकवला आहे. श्रद्धा कपूरचा हा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट असणार आहे. चित्रपटासाठी श्रद्धाला प्रभासकडून तेलगू भाषेचे धडे मिळाले होते. तर, श्रद्धाने प्रभासला हिंदी भाषेतील उच्चारांविषयी मार्दगर्शन केले होते.  गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रभासच्या वाढदिनी या चित्रपटाचा फर्स्ट टिझर आला होता. चित्रपटात नील नितीन मुकेश, एवलिन शर्मा आणि जॅकी श्रॉफ हे कलाकारही झळकणार आहेत. येत्या १५ ऑगस्टला ‘साहो’ चित्रपट देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -