मुलीच्या कॉस्मेटिक सर्जरीच्या अफवांवर; काजोलने दिलं सडेतोड उत्तर

मुलीच्या कॉस्मेटिक सर्जरीच्या अफवांवर; काजोलने दिलं सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगणची अजून बॉलिवूडमध्ये एन्ट्री झालेली नाही. परंतु तरीही ती अनेकदा चर्चेत असते. न्यासा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते, शिवाय अनेक स्टाईल फोटो न्यासा सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून न्यासाच्या नव्या लूकमुळे ती चर्चेत आली होती. दिवाळी पार्टीमधील न्यासाचा लूक अनेकजण आश्चर्यचकित झाले होते.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काजोलने आपल्या मुलीच्या ट्रांसफॉर्मेशनवर वक्तव्य केलं आहे. तेव्हा ती म्हणाली की, “तिच्याकडे भरपूर ब्यूटी हॅक आहेत. खरंच, मी सुद्धा तिच्याकडून या टिप्स घेत असते. न्यासा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ब्यूटी आणि हेल्थबाबत अनेक गोष्टी तिला ठाऊक आहेत. ती आठवड्यातून तीन वेळा फेस मास्क लावते आणि मला देखील हे करायला सांगते. न्यासा तिच्या वडीलांप्रमाणेच फिटनेस फ्रीक आहे”.

 


हेही वाचा :

‘आदिपुरुष’च्या वादावर कृती सेननने दिलं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

First Published on: November 19, 2022 4:50 PM
Exit mobile version