लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विग्नेशने शेअर केला फॅमिली फोटो

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विग्नेशने शेअर केला फॅमिली फोटो

टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षी 9 जून रोजी ते विवाहबंधनात अडकले होते. त्यांचा विवाह चेन्नई येथील महाबलिपुरममधील एका रिसॉर्टमध्ये पार पडला होता. लग्नानंतर काही महिन्यातच नयनतारा आणि विग्नेश सरोगीसच्या माध्यामातून जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांनंतर मुलांचा जन्म झाल्याची बातमी समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

दरम्यान, आज त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विग्नेश शिवनने सोशल मीडियावर मुलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नयनताराने आपल्या दोन्ही मुलांना कुशीत घेतलेले दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की, “उईर आणि उलागम तिच्या हातात.”

लग्नापूर्वी 6 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये होते नयनतार आणि विग्नेश

चित्रपटसृष्टीशी जोडलेले असल्याने या दोघांची लव स्टोरी फार चर्चेत असते. या दोघांची पहिली भेट एका सेट वर झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेशने केले होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. मैत्री झाली आणि त्याचंच रूपांतर प्रेमात झाले. 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर नयनतारा आणि विग्नेशने 25 मार्च 2021 रोजी साखरपुडा केला आणि 9 जून 2022 रोजी त्यांचे लग्न पार पडले.


हेही वाचा : पळा, पळा भूत आलं… उर्फीचा नवा लूक पाहून चाहते घाबरले

First Published on: June 9, 2023 2:21 PM
Exit mobile version