घरमनोरंजनपळा, पळा भूत आलं... उर्फीचा नवा लूक पाहून चाहते घाबरले

पळा, पळा भूत आलं… उर्फीचा नवा लूक पाहून चाहते घाबरले

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. अशातच, उर्फीचा नव्या लूकमधील अतरंगी फोटो समोर आले आहेत. या लूकमध्ये उर्फीला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

उर्फी जावेदच्या नव्या लूकचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फीच्या नव्या लूकमध्ये तिने एक भला मोठा निळ्या रंगाचा अंगरखा घातलेला आहे. शिवाय तीने तोंड देखील पूर्णपणे झाकलेले आहे. यात उर्फीचे तोंड, डोळे आणि बोट दिसत आहेत. बाकीचे पूर्ण शरीर झाकलेले आहे. अशातच आता अनेकजण उर्फीला पुन्हा ट्रोल करु लागले आहेत. तर अनेकजण तिचं कौतुकही करताना दिसत आहे. शिवाय काहींना उर्फीला जादू देखील म्हटलं आहे.

- Advertisement -

उर्फीच्या नव्या लूकवर चाहत्यांची प्रतिक्रिया

उर्फीच्या या नव्या लूकवर एकाने लिहिलंय की, आज उर्फीने अनेकांची बोलती बंदी केली,चमत्कार केला. तर दुसऱ्याने लिहिलंय की, ही खरंच उर्फी आहे का, भूत आहे? तर तिसऱ्याने लिहिलंय की, पळा, पळा, भूत आलं.

Urfi Javed pulls off an outlandish outfit

- Advertisement -

दरम्यान, 2016 मध्ये उर्फीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त उर्फी जावेद ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘स्प्लिट्सविला’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली आहे.

 


हेही वाचा :

शाहिद कपूरला सुपरहिट चित्रपट देऊनही काम मिळेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -