‘होय, दिशावर सामूहिक बलात्कार झाला’, प्रत्यक्षदर्शीने सांगितली त्या रात्रीची भयानक कथा

‘होय, दिशावर सामूहिक बलात्कार झाला’, प्रत्यक्षदर्शीने सांगितली त्या रात्रीची भयानक कथा

दिशा सालियन

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची दिवंगत मॅनेजर दिशा सालियन या दोघांच्याही आत्महत्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. दिशा सालियनवर मृत्यूपुर्वी बलात्कार झाला होता, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता याच पार्टीत उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने देखील दिशावर बलात्कार झाल्याची माहिती न्यूज नेशन या वृत्तवाहिनीला दिली आहे. ८ जूनला झालेल्या पार्टीत एकूण चार लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती या व्यक्तीने दिली आहे. या पार्टीत एका बॉलिवूड कलाकाराचा मुलगा देखील उपस्थित होता, अशीही माहिती या व्यक्तीने दिली आहे.

हे वाचा – दिशा सालियनवर बलात्कार करून हत्या – नारायण राणे

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ८ जून रोजी मालाड येथील एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरु होती. या पार्टीला दिशा, तिचा प्रियकर रोहन रॉय आणि इतर मिळून ६ लोक होते. यापैरी चार जणांनी फ्लॅटच्या एका रुममध्ये तिच्यावर बलात्कार केला. तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून म्युझिक आवाज मोठ्याने लावला होता. आपल्या बचावासाठी तिने खूप प्रयत्न केला, पण म्युझिकच्या आवाजामुळे तिचा आवाज दाबला गेला. ८ जूनला तिचा मृत्यू होऊनही दिशाचा फोन १७ जूनपर्यंत कसा चालू होता? असाही प्रश्न प्रत्यक्षदर्शीने उपस्थित केला आहे.

 

प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितले की, त्या रात्री काय झाले, हे मी सीबीआयला सांगायला तयार आहे. माझ्या जीवाला धोका आहे, तरिही सत्य बाहेर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार. तसेच फाँरेसिक विशेषज्ञने याच चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दिशाच्या शरिरावर आणखी काही जखमा होत्या, ज्या ती उंचीवरुन पडण्याच्या आधीच झालेल्या असाव्यात. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिचा प्रियकर रोहन रॉय फरार असून तो मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती, रिपब्लिक चॅनेलने काही दिवसांपूर्वी दिली होती.

हे वाचा – दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत? मुंबई पोलिसांनी केला खुलासा!

सुशांतला याची कुणकुण लागली होती

दिशासोबत जो बाका प्रसंग घडला, याची कुणकुण सुशांतला लागली होती. ९ जून पासून तो काही मित्रांना फोनवरुन याबाबत माहिती देत होता. लवकरच मीडियासमोर दिशाच्या मृत्यूचे सत्य बाहेर आणेन, असेही त्याने काही जणांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर १४ जून रोजीच त्यानेही संशयस्पदरित्या आत्महत्या केली.

 

First Published on: September 19, 2020 7:32 PM
Exit mobile version