प्रियंकाला पुन्हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्याची संधी

प्रियंकाला पुन्हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्याची संधी

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री प्रियंका चोप्राचा बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूडमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. अनेक हॉलिवूड मालिका चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. बॉलिवूडमध्ये काम करता करता हॉलिवूडमध्येही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियंकाने नुकतच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकण जाहीर केले होते. आता प्रियंकाला अजून एका पुरस्कार सोहळ्याचे नामांकण जाहीर करण्याची संधी मिळत आहे. प्रियंका आता ७४ व्या ‘ब्रिटिश अकॅडमी चित्रपट पुरस्कार’ जाहीर करणार आहे. १० आणि ११ एप्रिल रोजी हा सोहळा रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये होणार आहे. प्रियंका सध्या लंडनमध्ये आहे. तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून बाफ्ताच्या ऑफिशियल पेजवरची पोस्ट शेअर केली आहे. ”हा माझा सन्मान आहे. रविवारी हे पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी फार उत्सुक आहे.” असे ती पोस्ट शेअर करताना म्हणाली आहे.


हे वाचा- ‘क्रिकेटवेडा सिद्धार्थ’ दुखापतीनंतरही सरावासाठी उतरला मैदानात

First Published on: April 9, 2021 2:51 PM
Exit mobile version