सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध

सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले, तर काहींनी या चित्रपटवर अनेक टिका सुद्धा केल्या आहेत. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून ९० च्या दशकातील काश्मीर खोऱ्यातून हिंदूंचे झालेले पलायन आणि तेथील पंडितांवरील अत्याचाक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.

संपूर्ण जगभरातून चित्रपटाला पसंती मिळत होती. परंतु आता ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटातून दोन धर्मांमध्ये फूट, विखार आणि शत्रूत्व उत्पन्न होण्याची भीती असून सिंगापूर फिल्म सर्टिफिकेशनच्या मार्गदर्शक तत्वात ‘द काश्मीर फाइल्स’ बसत नसल्याचे स्पष्टीकरण सिंगापूरने दिले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ मुस्लिमांविरोधात असून काश्मीरमध्ये जे संकट आले त्यात फक्त हिंदूंनाच त्रास झाला असे दाखवण्यात आले आहे, हे सिंगापूर सरकारला मान्य नसल्याने हा चित्रपट सिंगापूरमध्ये प्रसिद्ध केला जाणार नाही असे सिंगापूर सरकारने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

खरंतर सिंगापूर सरकारच्या मते, ‘द कश्मीर फाइल्स’ मध्ये वेगवेगळ्या धर्म, जातींमध्ये शत्रूत्व निर्माण होईल असे चित्रिकरण करण्यात आले आहे, सिंगापूरमध्ये अनेक विविध जाती, धर्माचे आणि वंशाचे लोक राहतात. या विविध धार्मिक समुहांमधील सामाजिक एकता आम्हाला बिघडवायची नाही, त्यामुळे सिंगापूरच्या चित्रपट कायद्यानुसार या चित्रपटाच्या प्रसारणास आम्ही बंदी घालत आहोत.

भारतामध्ये ११ मार्च रोजी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपटाची स्तुती करत हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असे आवाहन केले होते. भाजपच्या अनेक मंत्री, नेत्यांनीही ‘द काश्मीर फाइल्स’ची स्तुती करत त्यांच्या राज्यांनी हा चित्रपट त्यांच्या राज्यात करमुक्त केला. चित्रपटाच्या सोशल मीडियावरील तुफान प्रमोशनमुळेही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला.

 


हेही  वाचा :‘बॉलिवूडला मी परवडणारा नाही’…. महेश बाबूने काढली बॉलिवूडची लायकी

First Published on: May 11, 2022 10:56 AM
Exit mobile version