‘रंगीला राजा’ सुपरफ्लॉप, दिग्दर्शकांनी केले ‘हे’ आरोप

‘रंगीला राजा’ सुपरफ्लॉप, दिग्दर्शकांनी केले ‘हे’ आरोप

अभिनेता गोविंदा आणि दिग्दर्शक पहलाज न‍िहलानी

बॉलिवूडचा नंबर १ अभिनेता म्हणजेच गोविंदा सध्या आपल्या करियरच्याय वाईट अवस्थेत असल्याचे चित्र आहे. मागील अनेक महिन्यांपासून त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी गोविंदाने सेन्सॉर बोर्डचे माजी अध्यक्ष आणि दिग्दर्शक पहलाज निहलानी यांचा चित्रपत्रात काम केले. या चित्रपटाला थिएटर दिली जात नसल्याचा आरोप गोविंदाने काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र आता चित्रपटाचे दिग्ददर्शक पहलाज यांनी गंभीर आरोप केले आहेत. मला आणि गोविंदाला संपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे. हा प्रयत्न बॉलिवूडमधूनच केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काय म्हणाले पहलाज

“सेंसर बोर्डमध्ये कार्यरत असताना माझ्या काम करण्याच्या पद्धतीवरून मला टार्गेट बनवल्या गेले. माझ्या चित्रपटात काम केल्यामुळे आता गोविंदालाही टार्गेट करण्यात येत आहे. बॉलिवूडमध्ये माझे आणि गोविंदाचे अनेक क्षत्रू आहेत.” – दिग्दर्शक पहलाज निहलानी

First Published on: January 23, 2019 1:25 PM
Exit mobile version