घरमनोरंजनआगामी चित्रपटाबाबत गोविंदाने व्यक्त केली 'ही' भिती

आगामी चित्रपटाबाबत गोविंदाने व्यक्त केली ‘ही’ भिती

Subscribe

माझा चित्रपट प्रदर्शित होऊ नये असा प्रयत्न चित्रपट सृष्टीतील काही लोक करत असल्याचे वक्तव्य नंबर वन अभिनेता गोविंदाने केले आहे.

बॉलिवूडचा नंबर १ अभिनेता गोविंदा याने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल भिती व्यक्त केली आहे. ‘रंगीला राजा’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रदर्शित होण्याअगोदरच हा चित्रपट चर्चेत आला. हा चित्रपट रिलीज सेन्सॉर बोर्ड मध्ये अडकला होता. या चित्रपटातील काही दृष्यांना कात्री लावण्यात आली होती. चित्रपट सृष्टीतील काही लोक आपल्या चित्रपट थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य गोविंदाने पत्रकार परिषदेत केले आहेत. गोविंदाच्या आगामी चित्रपटामध्ये २० दृष्य कापण्यात आले असल्याचे सांगितल्या जात आहे.

काय म्हणाला गोविंदा 

“असे मागील नऊ वर्षांपासून होत आहे. चित्रपट सृष्टीतच माझ्या विरोधात कट कारस्थान रचले जात आहे. माझ्या चित्रपटाला चांगल्या स्तरावर प्रदर्शित केले जात नाही. माझे चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न केला जातोय. याचे नुकतेच उदाहरण शुक्रवारी दिसणार आहे.”- अभिनेता गोविंदा

- Advertisement -

केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्ड (सीएफबीसी) चे माजी चेअरमॅन पहलाज निहलानी त्यांचा आगामी चित्रपट ‘रंगीला राजा’वर कात्री चालवल्यामुळे नाराजीचे स्वर उठत आहे. यासाठी निहलानी यांनी मुंबई न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -