‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने उडवली मोदींची खिल्ली; होतेय ट्रोल

‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने उडवली मोदींची खिल्ली; होतेय ट्रोल

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आली आहे. सोमवारी अचानक रडारवरून गायब झालेल्या भारतीय हवाई दलाच्या मालवाहतूक विमानावरून वीणा मलिकने एक असंवेदनशील ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने नरेंद्र मोदी यांचीही खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर वीणा मलिकला विरोध करत नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

#IAF An-32, कोसळलेले नाही. वातावरण खूप खराब आहे आणि रडार याचा शोध घेऊ शकत नाहीये, असे ट्विट करत वीणाने त्यात पीएम नरेंद्र मोदी, भारतीय हवाई दलास टॅग केले आहे.

अशा केल्या प्रतिक्रिया

यावर नेटकऱ्यांनी वीणा मलिकला धमकी देत तिच्यावर खोटं बोलण्याचा आरोप देखील केला आहे. एका युजरने “परफेक्ट उदाहरण, जिस थाली में खाना उसी थाली में छेद करना.” अशी प्रतिक्रिया दिली. तर ‘स्वतः लोकप्रियतेसाठी पाकिस्तानी काहीही करतात. खोटे बोलणे हेच यांचे काम. काम मिळत नसल्याने आता यांनी हे प्रकार सुरू केले आहेत. अशा वागण्यामुळे तुम्हाला बॉलिवूडमधून हाकलले गेले,’ अशी प्रतिक्रिया दुसऱ्या युजरने दिली आहे.

आसामच्या जोरहाटमधून सोमवारी दुपारच्या वेळी अरूणाचल प्रदेशकरिता निघालेले भाभारतीय हवाई दलाचे An-32 हे विमान बेपत्ता आहे. या विमानाचा शोध सुरू आहे. विमानात ८ क्रू मेंबर्स आणि ५ लोक होते. हवामान चांगले नसल्याने हे सर्च ऑपरेशन करण्यात समस्या उद्भवत आहे.

 विंग कमांडर अभिनंदनचीही उडवलेली खिल्ली

यापुर्वी देखील वीणा मलिकने IAF विंग कमांडर अभिनंदनचे सोशल मीडियावर मजाक उडवत अभिनंदन यांचा फोटो शेअर करत, ‘अभी अभी तो आए हो…अच्छा मेहमाननवाजी होगी आपकी,’ असे लिहिले होते. त्यावेळीही विणा मलिक वादात सापडली होती. बॉलिवूडच्या अभिनेत्यांना लक्ष्य करत, ‘माझ्या बॉलिवूडच्या मित्रांनो, आमच्याशी पंगा घेऊ नका,’ असे ट्विट तिने केले होते.

First Published on: June 5, 2019 1:14 PM
Exit mobile version